संदीप अंकलकोटे, चाकूर भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात जीपला दिलेल्या धडकेत ११ जण ठार झाले. मृतांत दोन महिला आणि एका दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. चाकूरपासून ३ किलोमीटर अंतरावरील ब्रह्मवाडीजवळ हा अपघात झाला.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक ट्रक ब्रह्मवाडीजवळ उदगीरहून प्रवासी घेऊन येणाऱ्या क्लूजर जीपवर धडकला. त्यानंतर ट्रकने जीपला जवळपास ४० फूट लांब फरफटत नेले. जीपमध्ये १३ प्रवासी बसले होते. त्यापैकी १० प्रवासी जागीच ठार झाले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागोराव फावडे (३६, लातूर), दत्ता शेंडगे (६०, नांदेड), प्रशांत पवार (२७), त्यांची पत्नी अश्विनी (२५) व मुलगी श्वेता (दीड वर्ष, सर्व रा. तावशीगड, उस्मानाबाद), अनिता कोपरकर (३५, औसा), धोंडिराम शेळके (२७), विजयकुमार रावते (२८, रा. नांदगाव, जि. लातूर), अमोल नागरगोजे (२५, रा. दावणगाव, ता. रेणापूर), नागनाथ केसाळे (२५, रा. नागेवाडी, ता. चाकूर), धनंजय कदम (५०, रा. महाळंबा, ता. औसा) यांचा अपघातात मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
लातूरमध्ये ट्रक-जीप अपघातात ११ ठार
By admin | Updated: July 25, 2015 01:24 IST
भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात जीपला दिलेल्या धडकेत ११ जण ठार झाले. मृतांत दोन महिला आणि एका दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे.
लातूरमध्ये ट्रक-जीप अपघातात ११ ठार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}