‘प्लॅचेंट’प्रकरणी 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा - पोळ

By Admin | Updated: July 22, 2014 01:39 IST2014-07-22T01:39:50+5:302014-07-22T01:39:50+5:30

तपासासाठी पोलिसांनी ‘प्लॅचेंट’चा वापर केल्याचा लेख प्रसिद्ध करून माझी बदनामी झाली, याबद्दल मी ‘आऊटलूक’ मासिकाचे संपादक व पत्रकाराला 1क्क् कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस बजावली

100 crore for plotting 'platin' - Poll | ‘प्लॅचेंट’प्रकरणी 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा - पोळ

‘प्लॅचेंट’प्रकरणी 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा - पोळ

पुणो : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी ‘प्लॅचेंट’चा वापर केल्याचा लेख प्रसिद्ध करून माझी बदनामी झाली, याबद्दल मी ‘आऊटलूक’ मासिकाचे संपादक व पत्रकाराला 1क्क् कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस बजावली असून त्यांच्याविरूद्ध फौजदारी दावा दाखल करणार आहे, असे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी सांगितले. 
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘प्लॅचेंट’ केल्याचा पत्रकार आतिष खेतान यांचा लेख ‘आऊटलूक’ मासिकात 14 जुलैला प्रसिद्ध झाला होता. त्यावरून पोळ वादात सापडले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी चौकशी समिती स्थापनेची मागणी केली. पोळ यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत या आरोपांचा इन्कार केला. 
पोळ यांचे वकील हर्षद निंबाळकर म्हणाले, ‘आऊटलूक’चे पत्रकार आशिष खेतान व संपादक कृष्णा प्रसाद यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी आऊटलूक तसेच इतर वर्तमानपत्रे व प्रसारमाध्यमातूनही माफी मागावी व नुकसानभरपाई म्हणून 1क्क् कोटी रुपये द्यावेत, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी दोन आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 100 crore for plotting 'platin' - Poll