शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, शिक्षकेतरांना १००% उपस्थिती बंधनकारक; अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 06:13 IST

परीक्षांच्या कार्यपद्धतीत प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन अशा अनेक कामांचा समावेश होत असतो.

मुंबई : राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. दरम्यान विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी आणि त्याचे मूल्यांकन करून निकाल लावण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) मुदतवाढ मिळाली आहे. त्यानंतर आता परीक्षेच्या कामकाजासाठी विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापुढे १००% उपस्थिती लावणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.परीक्षांच्या कार्यपद्धतीत प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन अशा अनेक कामांचा समावेश होत असतो. अंतिम वर्षाच्या परीक्षा १ ते ३१ आॅक्टोबरपर्यंत घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर करणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले.निर्णयाविरोधात संघटनांकडून नाराजीबॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियनने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, रजिस्टार यांच्यासह आमदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत नाराजी व्यक्त केली. तर, एम. के. संघवी, आरकेटी -उल्हासनगर, आदर्श महाविद्यालय बदलापूर, केबीपी महाविद्यालय वाशी आदी ठिकाणी शिक्षकांना संसर्ग झाल्याची माहिती सचिव मधू परांजपे यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण