शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडात पोलिसांसाठी १० टक्के राखीव घरे?

By admin | Updated: September 10, 2014 03:15 IST

समाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी घरादाराची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या पोलिसांसाठी एक खूशखबर आहे.

जमीर काझी, मुंबईसमाजात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी घरादाराची पर्वा न करता कार्यरत राहणाऱ्या पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. भविष्यात म्हाडाच्या घराच्या सोडतीमध्ये त्यांना १० टक्के सदनिका राखीव असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मराठा व मुस्लीम समाजासाठी अनुक्रमे ६ व ५ टक्के घरांचा कोटा उपलब्ध होऊ शकतो. प्राधिकरणाकडून बांधल्या जाणाऱ्या घरांमध्ये या तीन घटकांसाठी स्वतंत्र आरक्षण ठेवावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती युसूफ अब्राहनी यांनी त्यांची भेट घेऊन सर्व घटकांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.महानगरामध्ये या घटकांतील वर्गांना घरांची समस्या प्रचंड भेडसावित आहे़ त्यामुळे सध्या कार्यान्वित असलेल्या विविध संवर्गांतील आरक्षणाला धक्का न लावता या घटकांना विशेष बाब म्हणून लॉटरीमध्ये सवलत देण्याचा आग्रह धरला आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, ही बिरुदावली असलेले दोन लाखांवर पोलीस राज्यात कार्यरत आहेत. त्यापैकी ५० हजारांवर कुमक एकट्या मुंबईतील असून, त्यांच्या घरांची समस्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली आहे. दीड कोटीवर मुंबईकरांच्या जीवित व वित्त- मालमत्तेच्या संरक्षणासाठी सण-उत्सवाची पर्वा न करता पोलिसांना बंदोबस्तामध्ये तैनात राहावे लागत आहे.