शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 08:43 IST

एका नर्सरी चालकांनी सांगितले की, अगदी काही महिन्यांपूर्वी वर्षभरात केवळ २०० सिंदूर रोपे विकली जात होती. आता ऑपरेशन सिंदूरनंतर तसेच पर्यावरण दिनानंतर मात्र याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

रेवा (मध्य प्रदेश) : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरने लोकांच्या हृदयात देशभक्ती निर्माण केली आहे. देशभक्ती आणि जागरूकतेचे प्रतीक बनलेल्या ‘सिंदूर’चा परिणाम नर्सरीमध्येही दिसून येत आहे. पर्यावरण दिनानिमित्त, ५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूरचे रोप लावले होते. त्यानंतर लोकांनी या झाडाची माहिती घेत त्याच्या रोपांची मागणी नर्सरीत, तसेच वन विभागांकडेही करायला सुरुवात केली आहे.

भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले

एका नर्सरी चालकांनी सांगितले की, अगदी काही महिन्यांपूर्वी वर्षभरात केवळ २०० सिंदूर रोपे विकली जात होती. आता ऑपरेशन सिंदूरनंतर तसेच पर्यावरण दिनानंतर मात्र याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. आता दररोजच लोक ही रोपे खरेदी करत आहेत. हे लक्षात घेता, वन विभागाने मोठ्या प्रमाणात नवीन सिंदूर रोपे लावण्याची योजना आखली आहे.

औषधी दृष्टिकोनातूनही खूप उपयुक्त

आयुर्वेदात, सिंदूरची वनस्पती ही दाह-विरोधी, अँटिऑक्सिडंट आणि पचन सुधारणारी मानली जाते. सिंदूरच्या बिया, पाने, फळे आणि साल अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जातात. त्याच्या बियांपासून बनवलेला रंग नैसर्गिक अन्न आणि सौंदर्यप्रसाधन रंग म्हणूनदेखील वापरला जातो.

महाराष्ट्र, हिमाचल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात लागवड

सिंदूरचे वैज्ञानिक नाव बिक्सा ओरेलाना आहे, जे बिक्सीसी कुटुंबातील एक वनस्पती आहे. याला कुमकुम ट्री किंवा कमील ट्री असेही म्हणतात. संस्कृतमध्ये याला रक्तपुष्प असेही म्हणतात.

भारतात या वनस्पतीची लागवड हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये केली जाते. मध्य प्रदेशमध्येही याची लागवड केली जाते.

सिंदूरच्या बियांपासून मिळणारा लाल-नारिंगी रंग हिंदू विवाहित महिला त्यांच्या भांगामध्ये सिंदूर म्हणून लावतात, जे शुभ मानले आहे. लिपस्टिकमध्ये वापर केला जात असल्याने काही भागांमध्ये याला लिपस्टिक ट्री असेही म्हणतात.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश