दिवाळीची कंटाळवाणी साफसफाई 'या' टिप्सच्या मदतीने होईल सोपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 12:28 PM2018-10-31T12:28:35+5:302018-10-31T12:29:07+5:30

सकाळी उठल्याउठल्याच आईने विचारलं , ' या आठवड्यात एखादी सुट्टी घेता येईल का? दिवाळीची साफसफाई करायची होती'. आणि मी डोळे चोळतच उत्तर दिलं, 'कदाचित नाही देणार गं, विचारून सांगते.' हे चित्र सर्वांच्याच घरी पहायला मिळतं.

easy tips for diwali cleaning | दिवाळीची कंटाळवाणी साफसफाई 'या' टिप्सच्या मदतीने होईल सोपी!

दिवाळीची कंटाळवाणी साफसफाई 'या' टिप्सच्या मदतीने होईल सोपी!

googlenewsNext

सकाळी उठल्याउठल्याच आईने विचारलं , ' या आठवड्यात एखादी सुट्टी घेता येईल का? दिवाळीची साफसफाई करायची होती'. आणि मी डोळे चोळतच उत्तर दिलं, 'कदाचित नाही देणार गं, विचारून सांगते.' हे चित्र सर्वांच्याच घरी पहायला मिळतं. दिवाळी आली की उत्साह असतोच पण दिवाळीसाठी साफसफाई करायची म्हटलं तर मात्र टाळाटाळ सुरू होते. अगदी कंटाळवाणी वाटते ही साफसफाई. मग आईला अनेक कारण देण्यात येतात. पण तुम्हाला माहीत आहे का? अशा काही टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही दिवाळीची कंटाळवाणी साफसफाई अगदी सहज करू शकता. जाणून घेऊयात अशा काही टिप्स ज्यामुळे साफसफाई करणं शक्य होतं. 

1. जुन्या वस्तूंना करा बाय-बाय 

सर्वात आधी घरातील फालतू आणि तुटलेलं सामान, क्रॉकरी इत्यादी वस्तू फेकून द्या. त्यामुळे घरातील सामान कमी होईल आमि नवीन घेण्यासाठीही मार्ग मोकळा होईल. 

2. किचनमधील खराब भांडी 

दिवाळीमध्ये किचनमध्ये साफसफाई करणं फार गरजेचं असतं. भांड्यांना सहज स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यामध्ये 5 ते 6 चमचे ब्लीच आणि डिटर्जंट पावडर मिक्स करा. या पाण्याने भांडी स्वच्छ केल्याने भांड्यावरील काळपटपणा, घाण दूर होईल आणि भांड्यांवर चमक येईल. 

3. भिंतींवरील डाग

घराची साफसफाई करताना सर्वात जास्त त्रासदायक काम म्हणजे घरातील भिंती स्वच्छ करणं. यासाठी व्हिनेगर लिक्विड सोपमध्ये मिक्स करा आणि स्पंजने भिंतीवरील डाग स्वच्छ करा. 

4. बाथरूम स्वच्छ करण्यासाठी 

बाथरूममधील सामान स्वच्छ करण्यासाठी बेबी ऑइलचा वपर करा. यामुळे साबणाचे डाग नाहीसे होतील.

5. सिंक आणि पाईप ब्लॉकेज काढण्यासाठी 

एक कप मीठ, बेकिंग सोडा आणि अॅपल व्हिनेगर एकत्र करून सिंक पाईपमध्ये ओता. यामुळे सिंक पाईपमधील ब्लॉक निघून जातील. 

6. लाकडाचे फर्निचर 

लकडाचे फर्निचर सहज स्वच्छ करण्यासाठी 1/4 कप व्हिनेगरमध्ये 1 कप पाणी मिक्स करा आणि त्याचा फर्निचर स्वच्छ करण्यासाठी वापर करा. 

7. फ्रिज स्वच्छ करण्यासाठी 

कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून फ्रिज आतून स्वच्छ करा. यामुळे फ्रिजमध्ये घाणेरडा वासही येणार नाही आणि फ्रिजमधील बॅक्टेरियादेखील नाहीसे होतील. 

8. ओव्हन 

दिवसभरामध्ये किचनमध्ये ओव्हनचा वापर अनेकदा करण्यात येतो. काम सोप करण्यासाठी ओव्हनचा वापर फायदेशीर ठरतो तेवढचं तो स्वच्छ करणंही कठिण असतं. एका स्प्रे बॉटलमध्ये सोडा, पाणी आणि लिंबू टाका. याने ओवनच्या आतमध्ये स्प्रे करा आणि कपड्याने पुसून घ्या. 

9. पंख्याची साफसफाई

पंख्याच्या पाती उशीच्या कव्हरच्या मदतीने स्वच्छ करा. सगळी घाण कव्हरच्या आतमध्येच झाडून टाका. पंखाही स्वच्छ होईल आणि घाणंही सगळीकडे पसरणार नाही. 

10. डोअर बेल आणि स्विच बोर्ड

एखाद्या मुलायम कपडा डिटर्जेंटमध्ये भिजवून घ्या. त्याने डोअर बेल आणि घरातील सर्व स्विच बोर्ड स्वच्छ करा. 

11. बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करा

बेकिंग सोडा टूथब्रशच्या मदतीने टाइल्सच्या कोपऱ्यांवर लावा. त्यानंतर टाइल्स गरम पाण्याने धुवून टाका. 

12.घरातील फरशी 

पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून त्याने घरातील फरशी स्वच्छ करा. यामुळे फरशीवरील सगळे डाग स्वच्छ होतील. 

13. एखाद्या वस्तूवरील गंज

बटाटे आणि बेकिंग सोड्याच्या मदतीने लोखंडाच्या वस्तूंवरील गंज काढून टाकण्यास मदत होईल. 

Web Title: easy tips for diwali cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.