शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पाठलाग करून बाप-लेकावर २२ जणांनी केला हल्ला; वडिलांचा मृत्यू,मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 18:15 IST

Murder in Latur आमच्याविरुद्ध औराद पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला खल्लास करतो, असे पाठलाग करताना म्हटले.

ठळक मुद्देयातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून २१ जण फरार आहेत.

निलंगा (जि. लातूर) : आधी झालेल्या भांडणाची कुरापत काढून तालुक्यातील सिंदखेड शिवारात अनिल तात्याराव सोळुंके (५५, रा. येळनूर) यांचा सोमवारी दुपारी खून करण्यात आला. मंगळवारी याप्रकरणी २२ जणांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आकाश अनिल सोळुंके व अनिल तात्याराव सोळुंके हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्याच वेळेस त्यांचा पाठलाग दिलीप सोळुंके, सिद्धू माने, विक्रम सोळुंके, दीपक सोळुंके, व्यंकट माने, तानाजी माने, बंकट माने, बिभीषण पवार, शेखर पवार, शिवाजी माने, परमेश्वर माने, सचिन सोळंके, सिद्धेश्वर सोळंके, सुरेश सोळुंके, पवन सोळुंके, विनोद सोळुंके, विशाल सोळुंके, वृश्चिकेत पवार, करण सोळंके, राहुल पवार, संजय सोळुंके, राजू सोळुंके (सर्वजण रा. येळनूर) हे आपल्या चारचाकी वाहनातून करीत होते. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, दगड होते. या सर्वांनी अनिल सोळुंके व आकाश सोळुंके यांना आमच्याविरुद्ध औराद पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला खल्लास करतो, असे पाठलाग करताना म्हटले. त्यामुळे सोळुंके पिता-पुत्र जिवाच्या भीतीने दुचाकीवरून शिंदखेड-गुंजरगा पाणंद रस्त्याने निघाले. मात्र, २२ जणांनी पिता- पुत्र यांना सिंदखेड शिवारातील ओढ्यात गाठून काठी, दगड, चाकूने मारहाण केली. त्यात अनिल सोळंके मयत झाले तर त्यांचा मुलगा आकाश गंभीर जखमी झाला. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आकाश सोळुंके याच्या फिर्यादीवरून २२ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक उदय सावंत हे करीत आहेत.

नातेवाइकांचा आक्रोश...मयत अनिल सोळुंके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, त्या २२ आरोपींना जोपर्यंत अटक केली जाणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेऊन आक्रोश केला. तथापि, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपाधीक्षक डॉ. दिनेश कोल्हे यांनी घटनास्थळास भेट देऊन चौकशीचे आदेश दिले. यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असून २१ जण फरार आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूर