उदयगिरीत ऑनलाईन जाणीव जागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:40+5:302021-04-01T04:20:40+5:30

यावेळी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वित्त अधिकारी डॉ. दत्ता खंदारे, पुणे येथील डॉ. सुदर्शन बोबडे यांची उपस्थिती ...

Udayagiri online awareness program | उदयगिरीत ऑनलाईन जाणीव जागृती कार्यक्रम

उदयगिरीत ऑनलाईन जाणीव जागृती कार्यक्रम

यावेळी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वित्त अधिकारी डॉ. दत्ता खंदारे, पुणे येथील डॉ. सुदर्शन बोबडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. खंदारे यांनी पेटंटच्या विविध प्रकाराविषयी व त्याच्या नोंदणीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बोबडे यांनी बौद्धिक संपदा नोंदणीची प्रक्रिया विविध प्रकार व त्यातील मजकूर क्षेत्र, कल्पना यांची नोंद कशी करावी, याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विविध राज्यातील विविध विद्यापीठातील ३४० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. समन्वयक म्हणून प्रा.डॉ. बालाजी होकरणे यांनी काम पाहिले. प्रास्ताविकात प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी म्हणाले, बौद्धिक संपदेचे सध्याच्या जगामध्ये असलेल्या महत्त्वामुळे वाणिज्य शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. कमलाकर गव्हाणे, संयोजन सचिव डॉ. एकनाथ कोरपकवाड, प्रा.डॉ. मंजुनाथ मानकरी, प्रा.डॉ. राहुल आलापुरे, प्रा.डॉ. संतोष मुळे, प्रा. संतोष घोंगडे, प्रा.डॉ. अनिल मुंडे, ग्रंथपाल प्रा.डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा. सदानंद आवाळे, प्रा. राहुल बिरादार यांनी पुढाकार घेतला होता.

Web Title: Udayagiri online awareness program