शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार पालकांनी पुस्तके केली परत; आपण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षी अभ्यासक्रम बदलत नसल्याने जुन्या पुस्तकांचा पुनर्व‌ापर करता येऊ शकतो. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुस्तक जतनाची गोडी लागावी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांना होण्यासाठी पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यातील दोन हजार पालकांनी पुस्तके परत केली आहेत.

२०२०-२१ शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीच्या ३ लाख ४ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. कोरोनामुळे प्राथमिक विभागाच्या शाळा वर्षभर उघडल्याच नाहीत, तर पाचवी ते आठवीच्या शाळा काही काळ उघडल्या व प्रत्यक्ष वर्ग भरले नाहीत. त्यामुळे पुस्तकांचा फारसा वापर झाला नसल्याने शिक्षण विभागाच्या वतीने पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी आवाहन करण्यात आले होते.

पाल्याला नीटनेटकेपणा मूल्याची जाणीव व्हावी यासाठी पुस्तकांची निगा ठेवण्याचे भान त्यांना दिले पाहिजे. यातून अनेक फायदे आहेत. तसेच समाधानही आहे. पुस्तके मोफत मिळत असली तरी विद्यार्थ्यांनी ती जपून वापरली पाहिजेत.

- विजय सोनवणे.

पर्यावरण संवर्धनाची विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आवड होणे गरजेचे आहे. पुस्तक पुनर्वापराच्या योजनेतून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागतील. सर्व पालकांनी आपल्या पाल्याची पुस्तके शाळेत जमा करायला हवीत. त्यामुळे चांगला संदेश जाईल.

- दत्ता धाकपाडे.

समग्र शिक्षा अभियानातून दिलेले पुस्तक संचन पुनर्वापरासाठी देण्याकरिता वर्षभर निगा ठेवावी लागते. पुस्तक परत देण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावूया, या भावनेतून पुस्तकांची निगा, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळेल.

- विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी.

पुस्तके परत केलेल्या २ हजार पालकांनी इतरही पालकांनी पुस्तके परत करण्यासाठी आवाहन केले आहे. लातूर जिल्ह्यात जवळपास जिल्हा परिषदेच्या १२०० हून अधिक शाळा आहेत, तर खासगी, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा दोन्ही मिळून हजाराहून अधिक शाळा आहेत.

लातूर, औसा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, उदगीर, निलंगा, चाकूर, अहमदपूर तालुक्यातील पालकांना आवाहन केले आहे.