हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:40+5:302021-04-30T04:24:40+5:30

चाकूर येथील एका हॉटेलकडे बुधवारी दुपारी अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खलिद हसनमारे, अजित घंटेवाड हे गेले होते. तेव्हा नगरपंचायतीतील ...

Take action against hotel staff | हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

चाकूर येथील एका हॉटेलकडे बुधवारी दुपारी अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खलिद हसनमारे, अजित घंटेवाड हे गेले होते. तेव्हा नगरपंचायतीतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील काही अधिकारी, कर्मचारी हे तिथे एकत्र येऊन जेवण करीत होते. आम्हास पाहून त्यांनी जेवणास बोलाविले. आम्ही आत जाताना व्हिडिओ शूटिंग करीत होतो. वास्तविक, पाहता लॉकडाऊनच्या काळात हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश असतानाही सदरील अधिकारी व कर्मचारी हॉटेल चालकास हॉटेल उघडण्यास भाग पाडले. त्यामुळे हॉटेलवर जेवण करणाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे धनेश्वर, धोंडगे, हसनमारे, घंटेवाड यांनी केली आहे.

घटनेच्या चौकशीचे आदेश...

या घटनेच्या चौकशीचे आदेश नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना दिले आहेत. त्यात हॉटेल चालकावर दंडात्मक कारवाई होईल. तसेच घटनेतील कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सांगितले.

Web Title: Take action against hotel staff