वलांडीत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:40+5:302021-03-01T04:22:40+5:30

देवणी तालुक्यातील वलांडी येथे शनिवारी आणि रविवारी या दाेन दिवशी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोना ...

Spontaneous response to the public curfew in Valand | वलांडीत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

वलांडीत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवणी तालुक्यातील वलांडी येथे शनिवारी आणि रविवारी या दाेन दिवशी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोना प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर महसूल, पोलीस आणि ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या पथकाने ५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पथकात कृषी अधिकारी केदासे, सहायक पोलीस निरीक्षक बी. वाय. शिनगारे, ग्रामसेवक श्रीकांत पताळे, माधव सगर, बी. व्ही. नागालगावे, एस. पी. पतंगे, तलाठी अतीश बनसोडे, पोलीस कर्मचारी साळुंके, ग्रामपंचायत कर्मचारी गंगाधर विभूते, रोजगार सेवक विठ्ठल बनसोडे, आदींचा सहभाग आहे. नागरिकांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यापुढेही काेराेनाच्या नियमांचे पालन करतील. शिवाय, प्रशासनाला सहकार्य करतील, असे सरपंच राणी भंडारे म्हणाल्या.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे...

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या सूचनेनुसार पथकांची नेमणूक केली होती. दंडात्मक कारवाई हा उद्देश नव्हता. मात्र, नागरिकांना शिस्त लावण्यासाठी दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले तर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही.

- सुरेश घोळवे, तहसीलदार, देवणी

Web Title: Spontaneous response to the public curfew in Valand