शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

केळगावनजीक टेम्पो आणि वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात, सहा जण गंभीर जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 4:36 PM

Accident in Latur: निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

लातूर - निलंगा तालुक्यातील केळगाव ते बुजरूकवाडी मार्गावर टेम्पो व जीपची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत वऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपमधील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लातूर - जहीराबाद महामार्गावर केळगाव ते बुजरुकवाडी पाटीच्या दरम्यान निटूरकडे जाण्याच्या दिशेने टेम्पो क्र. एमएच १४ एएच ६२२३ व व जीप क्र. एमएच १४ सीसी ८३३८ चा समोरासमोर अपघात झाला. टेम्पो हा सोयाबीनची गुळी घेऊन केळगावच्या दिशेने जात होता. तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथून लग्नाचे वर्हाड घेऊन निघाली होती. यात जीपचा चुराडा झाला आहे. यामध्ये जीपमधील पाच ते सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ १०८ च्या रूग्णवाहिकेला संपर्क साधून बोलावून घेतले. सर्व जखमीला निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. निटुर पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे व पो. कॉ. हरी कांबळवाड यांनी पंचनामा करून दोन्ही वाहनांना महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय...मागील काही दिवसांपासून लातूर ते जहीराबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून या महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक व अनेक गावावर रस्ता दुभाजक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित महामार्ग प्रशासनाने लवकरात गाव तिथे रस्ता दुभाजक करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले ग्रामस्थ...केळगावपाटीनजीक अपघात झाल्याची माहिती मिळताच गावातील मदार माकणे, जहांगीर शेख, उस्मान पठाण, मुरली परळे, माजी मुख्याध्यापक स्वामी, कलांडी, बुजरूकवाडी शिवारातील काही नागरिक, शेतकरी तात्काळ मदतीसाठी धावले. रूग्णवाहिका येताच जखमींना मदतीचा हात दिला.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर