शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
3
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
4
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
5
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
6
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
7
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
8
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
9
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
10
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
11
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
12
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
13
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
14
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
15
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
16
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
17
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
18
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
19
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
20
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
Daily Top 2Weekly Top 5

औसा पालिकेत ऐतिहासिक 'बहिण-भाऊ' पर्व! नगराध्यक्षा बहीणीस उपनगराध्यक्ष भावाची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:25 IST

औसा पालिकेत नगराध्यक्ष पदी परवीन शेख तर उपनगराध्यक्ष पदी डॉ. अफसर शेख विराजमान

- महेबूब बक्षी
औसा (जि. लातूर):
"बहिणीचा पाठीराखा भाऊ" ही संकल्पना केवळ नात्यापुरती मर्यादित न राहता ती आता औसा शहराच्या विकासाचे केंद्रस्थान बनली आहे. औसा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी बहिण परवीन शेख आणि उपनगराध्यक्ष पदी भाऊ डॉ. अफसर शेख विराजमान झाले आहेत. मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत ही ऐतिहासिक निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली.

राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व 
डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २३ पैकी १७ जागा जिंकून पालिकेवर सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मंगळवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. अफसर शेख यांची उपनगराध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या सभेचे अध्यक्षपद स्वतः नगराध्यक्षा परवीन शेख यांनी भूषवले. यासोबतच हमीद सय्यद आणि जुनेद सय्यद या काका-पुतण्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली, ज्यामुळे पालिकेत अनुभवी आणि तरुण नेतृत्वाचा संगम पाहायला मिळत आहे.

विकासाचा 'बॅकलॉग' भरून काढणार 
निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. अफसर शेख म्हणाले, "आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा समतोल विकास साधणार आहोत. स्वच्छता मोहिमेत औशाने देशपातळीवर नाव कमावले आहे, आता महिला आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्राला उभारी देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असेल." या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करून शहरात मोठा जल्लोष साजरा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ausa Municipality witnesses historic 'Sister-Brother' term; siblings lead!

Web Summary : Ausa Municipality sees history as sister becomes Mayor, brother Deputy Mayor. Backed by NCP, they aim for balanced development, focusing on employment, health, and education.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६laturलातूरLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५