शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ८ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ८ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
5
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
6
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
7
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
8
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
9
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
10
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
11
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
12
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
13
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
14
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
15
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
16
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
17
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
18
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
19
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
20
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
Daily Top 2Weekly Top 5

पिता-पुत्राचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:52 IST

आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन त्यांच्यावर दुचाकी घालून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

अहमदपूर (जि.लातूर) : शेती पुन्हा नावावर करीत नसल्याचा राग मनात धरून तालुक्यातील रुद्धा येथील दोघांनी शेतातील आखाड्यावर झोपलेल्या पिता-पुत्रावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे बुधवारी उघडकीस आले आहे. खून करून अपघात झाल्याचा आरोपींनी बनाव रचला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपीस अटक केली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले, तालुक्यातील रुद्धा येथील शिवराज निवृत्ती सुरनर (७०) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर (१९) हे दोघे सोमवारी रात्री शेतातील आखाड्यावर झोपले होते. तेव्हा त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला ही धक्कादायक माहिती मिळताच तिने पोलिसांना कळविली. त्यानुसार, अहमदपूरचे पोनि.विनोद मेत्रेवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्थागुशाची तीन आणि अहमदपूर पोलिस ठाण्याच्या दोन अशा एकूण पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली. डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

पोलिस पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल सीडीआर विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत गुन्ह्यातील नरसिंग भाऊराव शिंदे (६०), केरबा नरसिंग शिंदे (२१, दोघे रा.रुद्धा, हमु.करेवाडी, ता.लोहा, जि.नांदेड) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

खुनाचे कारण उलगडले...शिवराज सुरनर यांच्या नावे शेती करून दिली होती. मात्र, नंतर ती शेती स्वतःच्या नावे करून देण्याची मागणी आरोपींनी केली. याच रागातून आरोपींनी खुनाचा कट रचला. सोमवारी रात्री आरोपींनी झोपडीजवळ दबा धरून बसून बाप-लेकावर हल्ला केला. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन त्यांच्यावर दुचाकी घालून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

१२ तासांत आरोपी जरबंदपोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. तपास पथकात पोनि.विनोद मेत्रेवार, सपोनि.संतोष केदासे, पोउपनि.स्मिता जाधव, स्थागुशाचे पोनि.सुधाकर बावकर, पोउपनि.रवि बुरकुळे, आनंद श्रीमंगल, तानाजी आरदवाड, हरी कांबळवाड, विशाल सारोळे, मारोती शिंदे, बाळू पांचाळ, हनुमंत आरदवाड, वैजनाथ दिंडगे, बबन चपडे यांचा समावेश होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Father, son murdered; accident staged to hide crime, shocking motive.

Web Summary : In Ahmedpur, a father and son were murdered over a land dispute. The perpetrators staged an accident to cover their tracks but were apprehended within 12 hours. Police investigations revealed the motive and led to the arrest of both accused.
टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी