शिवचरित्र म्हणजे संस्काराचे दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:24 AM2021-02-25T04:24:49+5:302021-02-25T04:24:49+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवटी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजीराव साखरे होते. यावेळी डॉ.दिनेश भिसे, ...

Shivacharitra is the hall of rites | शिवचरित्र म्हणजे संस्काराचे दालन

शिवचरित्र म्हणजे संस्काराचे दालन

Next

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवटी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजीराव साखरे होते. यावेळी डॉ.दिनेश भिसे, ब्रिजलाल कदम, कवी रामकृष्ण बैले यांची उपस्थिती होती.

सौताडेकर म्हणाले, स्वबळावर स्वतंत्र स्वराज्याची निर्मिती करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. सातत्याने टेन्शन घेणार्‍या व दिशाहीन झालेल्या विद्यार्थ्यांना शिवचरित्रात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शिवाय उत्तम नियोजन कसे करावे व भविष्याचा वेध कसा घ्यावा हे शिवचरित्रातून शिकायला हवे तरच जीवनात यशस्वी होता येईल.प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली. ब्रिजलाल कदम व दिनेश भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या शाळेतील अकरा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन मधुकर सूर्यवंशी यांनी केले. शिवाजी पेंडालवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मस्के, सोलापूरे, शेख, पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Shivacharitra is the hall of rites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.