शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा वॅाटर ग्रीडच्या मंजुरीमुळे स्वप्नपूर्तीचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST

सतत निसर्गाची अवकृपा असलेल्या मराठवाड्यास नेहमीच पाण्याची टंचाई असते. लोकनेते विलासराव देशमुख यांनी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातून २१ टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला ...

सतत निसर्गाची अवकृपा असलेल्या मराठवाड्यास नेहमीच पाण्याची टंचाई असते. लोकनेते विलासराव देशमुख यांनी कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातून २१ टीएमसी पाण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देऊन धोरणात्मक निर्णय घेतला. त्यांनी पाण्याच्या प्रश्नास नेहमीच प्राधान्य देऊन वेळोवेळी पाण्याची उपलब्धता करून दिली. लातूर जिल्ह्यात बराजची निर्मिती करून त्या माध्यमातून खूप मोठा आधार लातूरकरांना दिला. दरवर्षी अत्यल्प प्रमाणात पडणारा पाऊस व वाढत्या लोकसंख्येनुसार होणारी पाण्याची मागणी लक्षात घेऊन विविध माध्यमातून लातूर जिल्ह्यास पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे बनले असताना पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह मराठवाडा वॅाटर ग्रीडचा प्रकल्प सुरु होण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे धिरज देशमुख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते पाणी कसे उपयोगात आणता येईल यासाठी प्रयत्न सुरु असून त्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी संबंधित विभागास अभ्यास करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण व्हावा...

मराठवाडा वॅाटर ग्रीड प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात मंजुरी देऊन महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मक दृष्टीचा अवलंब केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शंकरराव गडाख व मंत्री मंडळातील इतर सदस्यांचे आभार व्यक्त करून सदरील प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सार्वजन प्रयत्नशील असल्याचे आ. धिरज देशमुख यांनी सांगितले.