शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

लातूर शहरातील बसस्थानक परिसरात बेशिस्त वाहनथांब्याने प्रवाशांची हेळसांड हाेत आहे. परिणामी, बसस्थानकात बसेस जाण्या-येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत ...

लातूर शहरातील बसस्थानक परिसरात बेशिस्त वाहनथांब्याने प्रवाशांची हेळसांड हाेत आहे. परिणामी, बसस्थानकात बसेस जाण्या-येण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे समाेर आले आहे. कधी राइट तर कधी लेफ्ट बाजूला ऑटाेरिक्षा थांबत आहेत. म्हणेल तिथे ही वाहने थांबत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण हाेत आहे. प्रवाशांच्या पळवापळवीसाठी ही स्पर्धा हाेत आहे. तर औसा राेडवर रस्त्यालगत थांबणाऱ्या बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. तर आंबाजाेई राेडवरही अशीच स्थिती आहे.

या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी...

बसस्थानक...

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांची मनमानी पाहायला मिळत आहे. प्रवाशी मिळविण्यासाठी ही स्पर्धा हाेत असल्याचे समाेर आले आहे. मात्र, प्रवाशांना याचा त्रास्त सहन करावा लागत आहे. शिवाय, बसस्थानकांच्या प्रवेशद्वारावरच हे ऑटाे थांबत असल्याने वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे.

गांधी चाैक...

लातुरातील गांधी चाैकातही प्रवाशी मिळविण्यासाठी ऑटाेचालकांमध्ये कमालीचे स्पर्धा आहे. यातून अस्ताव्यस्त वाहन थांबविणे, बेशिस्तपणे पार्किंग करण्याचे प्रकार पुढे आले आहेत. परिणामी, गांधी चाैकात वाहतूककाेंडी हाेत आहे. अशीच स्थिती मिनि मार्केट काॅर्नरला आहे.

गुळ मार्केट चाैक...

लातुरातील वर्दळीचा चाैक असलेल्या गूळ मार्केट चाैकात वाहतूककाेंडी कायम आहे. चाैकात असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे समाेर आले आहे. येथेही प्रवाशी मिळविण्यासाठी माेठी स्पर्धा आहे. यातूनच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हाेत आहे. परिणामी, नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

प्रवाशांना त्रास...

बसस्थानक, गूळ मार्केट चाैक, गांधी चाैक, मिनी मार्केट काॅर्नर यांसह शहरातील बहुतांश चाैकांत बेशिस्तपणामुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. याचा प्रवाशांना त्रास हाेत आहे. या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे. - अमृत जावळकर

लातुरातील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर ऑटाेवाल्यांचा दिवसभर थांबा असताे. मात्र, प्रवाशी मिळविण्यासाठी हाेणारी स्पर्धा आणि त्यातून वाहतूक नियमांचे उल्लंघन हाेत आहे. परिणामी, प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, बसचालकांनाही बसमध्ये आणि बाहेर काढताना कसरत करावी लागत आहे.

- प्रकाश जाधव

मनमानी भाडे...

१ गत मार्च २०२० पासून टप्प्या-टप्प्याने प्रवासी वाहतूक बदलली आहे. एका ऑटाेत दाेघे जण, किंबहुना कुटुंबातील तिघे असा प्रवास आहे.

२ त्यातच पेट्राेल-डिझेलची झालेली दरवाढ ही सामान्य वाहनधारकांच्या आवाक्याबाहेरची आहे. यातूनच प्रवासी भाडेवाढ करावी लागली आहे.

३ ही भाडेवाढ करताना समानतेचा नियम लागू नाही. प्रत्येक जण मनमानी भाडे आकारत असल्याने भाड्याबाबत प्रवाशी संभ्रमात आहेत.

४ ठरावीक अंतराला अमुक भाडे, तमुक भाडे असे ठरले पाहिजे. त्याबाबत जागृती हाेण्याची गरज आहे. मनमानी भाडेवाढीवर नियंत्रण काेणाचे आहे, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

बेशिस्त ऑटाेचालकांवर खटले

लातूर शहरातील चाैकाचाैकांत ऑटाेचालकांना थांबे ठरवून देण्यात आले आहेत. त्यांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. मात्र, काही ऑटाेचालकांकडून नियमांचे पालन हाेत नसल्याचे समाेर आले आहे. अशांवर वाहतूक शाखेकडून खटले दाखल केले जात आहेत. शिवाय, दंडही केला जात आहे.

- सुनील बिर्ला, पाेलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, लातूर