किल्लारीतील ग्रामीण रुग्णालयाचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:31+5:302021-04-30T04:24:31+5:30

किल्लारी : किल्लारी ग्रामीण रुग्णालय, लामजना येथील कोविड केअर सेंटरला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा ...

A review of the rural hospital at Killari | किल्लारीतील ग्रामीण रुग्णालयाचा घेतला आढावा

किल्लारीतील ग्रामीण रुग्णालयाचा घेतला आढावा

किल्लारी : किल्लारी ग्रामीण रुग्णालय, लामजना येथील कोविड केअर सेंटरला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या.

यावेळी त्यांनी रुग्णालय, सेंटरमधील आरोग्य सुविधा, औषधोपचार, जेवण आदी सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणखीन दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. दोडके, डॉ. सचिन बालकुंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे किशोर जाधव, औसा तालुका शिवसेना समन्वयक किशोर भोसले, विजय भोसले, बाळासाहेब बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, तलाठी विकास बुबने, आदी उपस्थित होते.

Web Title: A review of the rural hospital at Killari