शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST

उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी ...

उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, पालिकेचे मुख्याधिकारी भरत राठोड, पोलीस निरीक्षक नारायण उबाळे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, तालुका पशुधन अधिकारी सतीश केंद्रे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांना परेड संचलन करण्यास परवानगी दिली. तालुक्यातील सैनिकी शाळा, गृहरक्षक दल, पोलीस दलाने संचलनात सहभाग घेतला. त्यानंतर कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात तीन वर्षे सेवा बजावल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील व पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनिता येलमेटे यांनी केले. नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, राजेश बेंबळगे, मंडल अधिकारी शंकर जाधव, गणेश हिवरे, अनिल चव्हाण, तलाठी पंकज कांबळे, अमोल रामशेट्टे, दत्ता मोरे, राहुल आचमे, सत्यकांत थोटे, तोडकर, कवरे आदीनी पुढाकार घेतला.