शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST

पोलिसांनी सांगितले, अहमदपूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना उदगीर शहरातून ताब्यात घेतले हाेते. त्यांची अहमदपूर येथील पोलीस ठाण्याच्या तुरुंगात ...

पोलिसांनी सांगितले, अहमदपूर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींना उदगीर शहरातून ताब्यात घेतले हाेते. त्यांची अहमदपूर येथील पोलीस ठाण्याच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली हाेती. दम्यान, कोठडीत दुसऱ्या गुन्ह्यातील तीन आरोपीही दाखल झाले. एकूण सहा आरोपींचा एकाच तुरुंगात रात्रभर मुक्काम हाेता. सकाळी आरोपींना अहमदपूर येथील न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता, त्याच्यात उदगीर येथील चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात असलेल्या एका आरोपीचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला. परिणामी, पाेलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. इतर आराेपींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना थेट न्यायालयात हजर करण्यात आले. तर काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या आराेपीची सुनावणी थेट व्हिडिओ काॅन्फ्फरन्सच्य माध्यमातून झाली. आराेपींच्या संपर्कात आलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करण्यात आली. यातील अहवाल निगेटिव्ह आला आहे. परिणामी, या आरोपीला कुठे ठेवायचे, हा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४५ दिवसांच्या जामिनावर मुक्त केले आहे. त्याला उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे ठेवण्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत आरोपींना कोठडीत ठेवताना कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत निष्काळजीपणा केल्याचा समाेर आले आहे. आता पूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करण्याची वेळ आली आहे. सदर काेराेनाची बाधा झालेल्या आराेपीला अहमदपूर येथील काेविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. संबंधित आरोपीला जामीन मिळाला असून, त्याच्यावर काेविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. असा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार म्हणाले.

मंदावलेला काेरोना डाेके काढताेय वर...

लातूर शहरासह जिल्ह्यातील उदगीर, जळकाेट, अहमदपूर आणि इतर ठिकाणी काेराेनाची रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. याला राेखण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध उपाययाेजना राबविल्या जात आहेत. लातूर शहरात रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्नसाेहळ्यांनाही आता प्रशासनाकडून नियमावली लागू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. जळकाेट तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. मध्यंतरीच्या कालावधीत मंदावलेला काेराेना आता डाेके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.