शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीचा भावा घसरला, शेतकऱ्यांनी फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील येरोळ, कबनसांगवी, नागेवाडी, सताळा, डिगोळ, सुमठाणा, आंबेवाडी, बावलगाव, चांबरगा, बोळेगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या ...

शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील येरोळ, कबनसांगवी, नागेवाडी, सताळा, डिगोळ, सुमठाणा, आंबेवाडी, बावलगाव, चांबरगा, बोळेगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतात युवा शेतकरी व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करून एकमेकाच्या संवादाने एकत्र येऊन शेतीमध्ये लाखो रुपये खर्च करून मल्चिंग पेपरवर मिरची लागवड केली. मिरचीही चांगलीच बहरली हाेती. मात्र, हिरव्या मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परिसरातील शेतकरी आपली मिरची नळेगाव, उदगीर आणि लातूर येथील भाजी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जातात. लिलावामध्ये मिरचीला जेमतेम सहा ते दहा रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. महिला मजुराला तोडण्यासाठी किलोला पाच रुपये व मार्केटपर्यंत मालवाहतुकीसाठी एका पोत्याला ५० रुपये भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे मिरचीला एक्करी ५० हजार रुपये केलेला खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये विकतचे पाणी आणून जगविलेल्या मिरचीला भाव मिळत नसल्याने बाजारात कवडीमाेलाच्या भावात विक्री करावी लागत आहे. यातून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खर्चाचा तालमेळ बसेना...

उदगीर शहरातील बाजारात मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून लिलावामध्ये सहा ते बारा रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्यांकडून व्यापारी मिरचीची खरेदी करीत असल्याने मिरची तोडणीचा खर्च आणि मालवाहतुकीचे भाडे परवडत नसल्याने शेतातील मिरचीच्या फडावरच नांगर फिरवला असल्याचे कबनसांगवी येथील शेतकरी ओम वैजीनाथ सांगवे यांनी सांगितले.

लाखाे रुपयांचा फटका...

शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील गावात अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयाेगशील शेती करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. मात्र, बाजारात शेतीमाल, भाजीपाल्याला मिळणारा कवडीमाेल भाव हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा ठरला आहे. सध्याला हिरव्या मिरचीला भावच नसल्याने शेतकऱ्यांची हिरवी मिरची जाग्यावरच पिकली आहे. यातून लाखाे रुपयांचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. लागवड खर्चही पदरी पडत नसल्याने माेठे नुकसान झाले आहे.