प्लॅस्टिकचे ध्वज वापरू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST2021-09-17T04:25:17+5:302021-09-17T04:25:17+5:30

श्रीगणेश विसर्जनासाठी कोविड नियमांचे पालन करा लातूर : श्रीगणेशाचे विसर्जन १९ सप्टेंबर रोजी होणार असून, विसर्जनाच्या वेळी कोविड नियमांचे ...

Plastic flags should not be used | प्लॅस्टिकचे ध्वज वापरू नयेत

प्लॅस्टिकचे ध्वज वापरू नयेत

श्रीगणेश विसर्जनासाठी कोविड नियमांचे पालन करा

लातूर : श्रीगणेशाचे विसर्जन १९ सप्टेंबर रोजी होणार असून, विसर्जनाच्या वेळी कोविड नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत या सूचना करण्यात आल्या. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची उपस्थिती होती. मनपा तसेच नगरपालिकांच्या संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान कराव्यात, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्ह्यात १३ केंद्रांवर होणार लसीकरण

लातूर : जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये ग्रामीण रुग्णालय देवणी, औसा, अहमदपूर, मुरुड, चाकूर, जळकोट, किल्लारी, बाभळगाव, कासारशिरसी, रेणापूर ग्रामीण रुग्णालय तसेच निलंगा उपजिल्हा रुग्णालय व उदगीर उपजिल्हा रुग्णालयात १८ वर्षांपुढील वयोगटात लसीकरण होणार आहे. तसेच लस उपलब्धतेनुसार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण होणार आहे. लस उपलब्धतेनुसार कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा प्राधान्याने पहिला व दुसरा डोस दिला जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.एच.व्ही. वडगावे यांनी दिली.

Web Title: Plastic flags should not be used