पाेलिसांनी हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:16+5:302021-09-07T04:25:16+5:30

एखाद्या ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला असेल तर पाेलीस ठाण्यात धावत आलेल्या तक्रारदाराला संबंधित ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला जाताे. प्रत्यक्षात ...

Paelis crossed the line; After the complaint, what is the limit first? | पाेलिसांनी हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

पाेलिसांनी हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?

एखाद्या ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला असेल तर पाेलीस ठाण्यात धावत आलेल्या तक्रारदाराला संबंधित ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला जाताे. प्रत्यक्षात सीआरपीसी १४५ प्रमाणे तक्रारदार ज्या पाेलीस ठाण्यात गेला आहे तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची असल्यास नंतर ताे अर्ज त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र तसे घडतच नाही. यातून तक्रारदारांची मात्र नाहक हेळसांड हाेत असल्याचे समाेर आले आहे.

ही घ्या उदाहरणे...

तक्रार नाेंदविलीच नाही...

माझा माेबाइल चाेरीला गेला. याबाबत मी तक्रार देण्यासाठी गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गेलाे. ती हद्द शिवाजीनगर ठाण्यात येते, असे सांगून मला तेथे तक्रार देण्यासाठी सांगण्यात आले. शिवाजीनगरला आलाे तर येथेही हद्द कुठली आहे, यावरून प्रतिप्रश्न विचारण्यात आला. या दाेन ठाण्यांच्या हद्दीत माझी तक्रार काही नाेंदविण्यात आली नाही, असे तक्रारदाराने सांगितले.

हद्दीवरून तक्रारदार त्रस्त...

गूळ मार्केट आणि कव्हा नका परिसर दाेन पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत विभागाला आहे. चाैकात घडलेली घटना विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात येते आणि चाैकापासून ते गूळ मार्केट चाैकापर्यंतची हद्द गांधी चाैक पाेलीस ठाण्यात येते. अशावेळी हद्दीचा वाद उद्भवला की मग तक्रारदार चक्रावून जातात. यातून तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.

...आणि तक्रार नाेंदवून घेतलीच नाही

गुन्हा कुठे घडला यावरच पहिल्यांदा पाेलीस ठाण्यात अधिक चर्चा केली जाते. काेणाची हद्द आहे, हे आधी ठरविले जाते. या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारदार, फिर्यादींना मात्र नाहक त्रास सहन करावा लागताे. अशावेळी कंटाळलेल्या तक्रारदारांकडून बऱ्याचदा तक्रार देण्याची मानसिकता राहत नाही. याच हद्दीच्या वादातून माझी तक्रार नाेंदवूनच घेतली नाही, असेही एका तक्रारदाराने सांगितले.

Web Title: Paelis crossed the line; After the complaint, what is the limit first?