शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख वृक्ष लागवड मोहिमेला नागझरीत प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या माध्यमातून कृषिवन आणि सार्वजनिक वन विकासासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या माध्यमातून कृषिवन आणि सार्वजनिक वन विकासासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जात आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ओव्हरसीस व्हाॅलिंटर्स फॉर बेटर इंडिया संस्थेच्यावतीने एक लाख वृक्ष लागवडीच्या यंदाच्या उपक्रमाला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील नागझरी येथे प्रारंभ झाला़.

जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना सहभागी करून वृक्ष संवर्धन चळवळ गतिमान करण्याचा मानस व्यक्त केला‌ आहे. नागझरी आणि इंद्रठाणा येथील वृक्ष लागवड प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. मांजरासह इतर नद्यांच्या पुनरूज्जीवन प्रकल्पांची माहिती घेऊन नदीकाठी बांबू लागवड करण्याची सूचना केली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवाराने मागील चार वर्षांत मांजरा नदीकाठी तीन गावांत ४५ एकर जमिनीवर नियोजनबद्ध पद्धतीने ठिबक सिंचनचा वापर करून विस्तीर्ण जंगल तयार केले आहे. कमी, मध्यम व दीर्घ कालावधीची वृक्ष लागवड केली असून, विविध फळझाडे आाणि फुलांची झाडे लावली. यामुळे पशुपक्ष्यांना अन्नही मिळेल, जंगलातील जीवचक्र चालू राहील. राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र लातूर जिल्ह्यात असून, ते एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत क्षेत्र पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. गत ९ वर्षांत १००पेक्षा जास्त गावांत जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नदी-पुनरुज्जीवन आणि पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी कोरडवाहू आणि कमी पाण्यावर येणाऱ्या फळबागांचे नियोजन करून मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव गोमारे म्हणाले.

यावेळी नागझरीचे सरपंच श्रीराम साळुंखे, ज्ञानेश्वर पवार, श्रीराम पवार, भारत काळे, डॉ. वसुंधरा गुडे, शोभा गायकवाड, संजय गायकवाड, रोहित सर्वदे, नामदेव शिंदे, अंकुश गवळी उपस्थित हाेते.

फोटो ओळी : लातूर तालुक्यातील नागझरी येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.