शिरूर अनंतपाळातील १७ शाळांचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:33+5:302021-07-19T04:14:33+5:30

शिरूर अनंतपाळ : दहावीच्या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन आणि मागील वर्षातील गुण अशा पद्धतीने जाहीर करण्यात आला. तालुक्यातील १७ ...

One hundred percent result of 17 schools in Shirur Anantpala | शिरूर अनंतपाळातील १७ शाळांचा निकाल शंभर टक्के

शिरूर अनंतपाळातील १७ शाळांचा निकाल शंभर टक्के

शिरूर अनंतपाळ : दहावीच्या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन आणि मागील वर्षातील गुण अशा पद्धतीने जाहीर करण्यात आला. तालुक्यातील १७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला नाही. साडेआठशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २ तर खासगी १५ अशा एकूण १७ माध्यमिक शाळा आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्हा परिषद शाळा साकोळ, अनंतपाळ नूतन विद्यालय, लोकजागृती विद्यालय, रापका आणि जय भवानी विद्यालय, हालकी अशी ४ परीक्षा केंद्र आहेत. यंदा अंतर्गत मूल्यमापन आणि मागील वर्षातील गुणांच्याआधारे शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील माध्यमिकच्या १७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, परीक्षेला बसलेले सर्वच म्हणजे ८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

३४५ विद्यार्थी विशेष प्राविण्यात...

तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी ८५० विद्यार्थी बसले होते. ते सर्वच उत्तीर्ण झाले असले तरी त्यापैकी ३४५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित ४१८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ८७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

अनंतपाळ नूतन विद्यालयात सत्कार...

अनंतपाळ नूतन विद्यालयाचे १६५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ४४ विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर ९८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मंथन जयवंत हासबे याने ९९ टक्के गुण घेऊन प्रथम आला. त्याचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव जगताप, सचिव प्रभाकरराव कुलकर्णी, उपाध्यक्ष सूर्यकांतराव येरोळकर, कार्याध्यक्ष भारतराव कोंडेकर, प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे, पर्यवेक्षक प्रभाकर बिरादार, शिक्षक रवी कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: One hundred percent result of 17 schools in Shirur Anantpala