शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नीट : लातूरमधून आणखी दोघे ताब्यात; ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 05:19 IST

दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव (४०, रा. लातूर) याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : नीट प्रकरणात अटकेत असणारा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर) यास सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील आरोपीसोबत प्रवेशपत्र घेऊन ५० हजार ॲडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे ५ लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार केल्याचे संदर्भ तपासात पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गुणवाढीच्या दृष्टीने दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क असलेला उमरगा आयटीआयतील इरण्णा मष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) लातुरातील दोघा शिक्षकांकडून प्रवेशपत्र मागून घेत होता. ५० हजारांत बोलणी व्हायची. पूर्ण कामाचे ५ लाख ठरायचे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आली आहे. इरण्णाच्या शोधासाठी सोमवारी एक पथक देगलूर येथे आले होते. परंतु, आरोपी त्यांच्या हाती लागला नाही. देगलूरमध्ये इरण्णा याचे भाऊ आणि इतर नातेवाईक राहतात. इरण्णा धाराशिव जिल्ह्यात स्थायिक झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

‘तो’ करणार होता जिवाचे बरेवाईट...  दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव (४०, रा. लातूर) याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली. त्याच स्थितीत पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यालाही अटक करण्यात आली आहे.

आयटीआय शिक्षक इरण्णाची भूमिका काय?उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीवर असलेला इरण्णा कोनगलवार लातूर येथून ये-जा करतो. सोमवार व मंगळवारची त्याने रजा टाकल्याची माहिती आहे. लातुरातील आरोपी शिक्षक हे विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरण्णाला पाठवीत होती. इरण्णा ती पुढे दिल्लीला गंगाधरकडे पाठवीत. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवीत होता व त्याच्याच माध्यमातून दिल्लीशी कनेक्शन सुरू होते.  

दोघेही जिल्हा परिषद शिक्षकांचे सबएजंट?नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये चौकशी करीत असताना आणखी दोघांची नावे समोर आली असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही आरोपी दोन शिक्षकांचे सबएजंट म्हणून काम करीत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे आता एकूण सहा जणांचा संबंध या प्रकरणाशी जोडला गेला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, पेपरफुटी प्रकरणात आरोपी जलीलखाँ पठाण, संजय जाधव, इरण्णा कोनगलवार व दिल्लीचा गंगाधर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडणार नसल्याचे मुंडे म्हणाले.

पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे...  - जलीलखाँ पठाण याच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कपाट केंद्र प्रमुखाने सील केले असून, कामाचा पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे दिला आहे.- २० जूनपासून पठाण शाळेवर गैरहजर असताना २० व २१ जून रोजी मस्टरवर स्वाक्षरी केली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना तसा अहवाल पाठविला आहे. - अटकेसंदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :laturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र