शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासह सुसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाला आ. धिरज देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून १० मल्टीपॅरा मॉनिटर, ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २ सिलिंडर ...

मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाला आ. धिरज देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून १० मल्टीपॅरा मॉनिटर, ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २ सिलिंडर ट्रॉली, २ ईसीजी मशीन, ४ संगणक, ४ प्रिंटर, १ पोर्टेबल एक्स-रे मशीन, ३ बायपॅप मशीन या वैद्यकीय साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जि.प. सदस्य दिलीप नाडे, विजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, सर्जेराव मोरे, रविंद्र काळे, सुभाष काळे, मदन काळे, वैद्यकीय अधीक्षक सुनीता पाटील, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, डाॅ. दिनेश नवगिरे, प्रवीण पाटील, डाॅ. ईश्वरप्रसाद चांडक, माधव शिंदे, ज्ञानेश्वर भिसे, जयश्री तवले आदी उपस्थित होते.

सक्षम आरोग्य यंत्रणा हे विकासाचे द्योतक...

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा असतात, त्याच सुविधा ग्रामीण भागात असाव्यात म्हणून स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिल्या आहेत. उपचारासाठी ग्रामस्थांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असून, आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हे विकासाचे द्योतक असल्याचेही आ. देशमुख म्हणाले.