शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
3
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
4
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
5
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
6
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
7
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
8
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
9
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
10
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
11
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
12
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
13
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
14
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
15
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
16
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
17
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
18
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
19
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
20
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...

डोक्यात रॉड घालून व्यावसायिकाचा खून; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

By हरी मोकाशे | Updated: September 27, 2023 20:12 IST

या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

लातूर : देवणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक अशोक लुल्ले यांचा अज्ञातांनी डोक्यात रॉड घालून खून केल्याची घटना बुधवारी दुपारी त्यांच्या स्वत:च्या लॉजमध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

देवणी येथील अशोक मन्मथप्पा लुल्ले (६५) यांचे शहरातील उदगीर - निलंगा राज्य मार्गावर शिवपार्वती लॉज आहे. नेहमीप्रमाणे लुल्ले हे आपल्या लॉजवर थांबले होते. दरम्यान, कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी बुधवारी लॉजवर येऊन पाहिले असता एका खोलीत अशोक लुल्ले यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या डोक्यास रॉडसारख्या साहित्याने जबर मारल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटकर, देवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूदास गुट्टे, पोलिस उपनिरीक्षक कत्ते यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

श्वान पथक दाखल...या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. तसेच ठसे तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. लवकरच आरोपींचा शोध लागेल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन काटकर यांनी सांगितले.बाजारपेठ बंद...शहरातील प्रसिध्द व्यावसायिकाचा खून झाल्याची वार्ता काही वेळात शहरभर पसरली. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ आपली दुकाने बंद केली. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी चाेख बंदोबस्त ठेवला आहे. मयत अशोक लुल्ले यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११:०० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस