हडोळती गावाचा कारभार महिलांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST2021-02-09T04:22:27+5:302021-02-09T04:22:27+5:30

अहमदपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हडोळतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ...

The management of Hadolati village is in the hands of women | हडोळती गावाचा कारभार महिलांच्या हाती

हडोळती गावाचा कारभार महिलांच्या हाती

अहमदपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हडोळतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी व्ही.डी. सुळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात सदस्यांची बैठक बोलावण्यात आली हाेती. सरपंचपदासाठी शकुंतला भोगे आणि ज्योती धम्मानंद कांबळे यांनी आपले अर्ज दाखल केले हाेते. तर, उपसरपंचपदासाठी इंदुताई पवार यांनी अर्ज दाखल केला हाेता. सरपंचपदाच्या शर्यतीतून ज्योती कांबळे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सरपंचपदी शकुंतला वामन भोगे आणि उपसरपंचपदी इंदुताई पवार यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य रज्जाक शेख, महामूद पठाण, रेणुका गऊळकर, मीरा नायणे, शकुंतला पवार, प्रदीप नायणे, नामदेव कलवले, रामनारायण मुळके, फारूकाबेगम मनियार यांची उपस्थिती हाेती. यावेळी मंडळाधिकारी मधुकर क्षीरसागर, तलाठी विठ्ठल घुमनवाड, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गिरी, पोलीस पाटील बालाजी मिरकले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या निवडीनंतर सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. हडाेळती गावाचा कारभार महिलांच्या हाती आला आहे.

Web Title: The management of Hadolati village is in the hands of women