लायसन्सची मुदत संपली, आता घ्यावी लागेल अपाॅइंटमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:40+5:302021-06-10T04:14:40+5:30

अशी घ्या अपाॅइंटमेंट अनलाॅक सुरू झाल्याने साेमवारपासून प्रत्यक्ष शासकीय कार्यालयातील कामकाजाला गती आली आहे़ जिल्ह्यातील वाहनधरकांना आपल्या लायसन्सचे नूतणीकरण ...

License expired, now you have to make an appointment | लायसन्सची मुदत संपली, आता घ्यावी लागेल अपाॅइंटमेंट

लायसन्सची मुदत संपली, आता घ्यावी लागेल अपाॅइंटमेंट

अशी घ्या अपाॅइंटमेंट

अनलाॅक सुरू झाल्याने साेमवारपासून प्रत्यक्ष शासकीय कार्यालयातील कामकाजाला गती आली आहे़ जिल्ह्यातील वाहनधरकांना आपल्या लायसन्सचे नूतणीकरण करण्यासाठी आता ऑनलाईन अपाॅइंटमेंट घ्यावी लागणार आहे़ अपाॅइंटमेंट मिळाल्यानंतरच त्यांच्या लायसन्सचे नूतनीकरण हाेणार आहे़ यासाठी परिवहन विभागाने दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन, अपाॅइंटमेंट घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे़

असा आहे काेटा

लातूर येथील उप-प्रादेशिक परिवहन विभागाने लायसन्सच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे़ यासाठी दवदिवशी १२० जणांच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी काेटा जाहीर करण्यात आला आहे़ टप्प्या-टप्प्याने हा काेटा जाहीर केला जाणार आहे़ ज्यांनी ऑनलाईन अपाॅइंटमेंट घेतली आहे़ अशा वाहनधारकांनी आपल्या लायसन्सचे नूतनीकरण दिलेल्या तारखेला आणि वेळेत करून घेण्याची गरज आहे़

पहिल्या दाेन दिवसांत १०० वाहनांची नाेंदणी

राज्य शासनाने जाहीर केलेले कडक निर्बंध मागे घेतल्यानंतर साेमवारपासून अनलाॅकचा टप्पा सुरू झाला आहे़ परिणामी, आता लातूरच्या उप-प्रादेशिक कार्यालात वाहननाेंदणीबरोबरच इतर कामकाजाला प्रारंभ झाला आहे़ साेमवार आणि मंगळवारी जवळपास १०० वाहनांची नाेंदणी झाली आहे़ हा आकडा आता वाढण्याची शक्यता आहे़ अनेकांनी आपल्या ऑनलाईन अपाॅइंटमेंट घेतली आहे़

कामकाजाला गती

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे एप्रिल आणि मे महिन्यात कामकाज पूर्णत: ठप्प झाले हाेते़ आता अनलाॅकचा टप्पा सुरू झाल्याने साेमवारपासून कामकाज पूर्वपदावर आले आहे़ यासाठी आता वाहनधारकाच्या लायसन्ससह इतर कामे हाेतील़ शिवाय, जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि निलंगा येथेही वाहनधारकांच्या साेयीसाठी शिबिरांचे आयाेजन केले असून, याचा लाभ घ्यावा़

- विजय भाेये,

उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर

Web Title: License expired, now you have to make an appointment