शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लातूर वूमेन प्रीमिअर क्रिकेट लीगला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST

लातूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाविद्यालय व डाॅ. आम्रपाली अभयसिंह देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ...

लातूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी शाहू महाविद्यालय व डाॅ. आम्रपाली अभयसिंह देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लातूर वूमेन क्रिकेट लीग स्पर्धेला सुरुवात झाली.

या स्पर्धेत चार महिला संघांनी सहभाग नोंदविला असून, यात क्रेझी वूमेन, पीएसजी लातूर वाॅरियसर्स, चक दे इंडिया व शाहू सुपर वूमेन या संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डाॅ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, तालुका क्रीडाधिकारी मीरा रायबान, प्राचार्य डाॅ. महादेव गव्हाणे, प्राचार्य बी.ए. मैंदर्गी, क्रीडाधिकारी कृष्णा केंद्रे यांची उपस्थिती होती.

या स्पर्धा बार्शी रोडवरील राजर्षी शाहू क्रीडा संकुलात होत असून, रविवारी साखळी सामन्यांसह अंतिम सामना रंगणार आहे. विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुरुषांच्याही क्रिकेट लीग स्पर्धा घेण्यात आल्या.

यशस्वीतेसाठी प्रा. अनिरुद्ध बिराजदार, रत्नराणी कोळी यांच्यासह शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

महिला सबलीकरणासाठी या स्पर्धेचे शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागामार्फत आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा लीग पद्धतीने होत असून, महिला क्रिकेटपटूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. साखळी स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने शनिवारी घेण्यात आले. महिला सबलीकरणासाठी या स्पर्धेचे शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागामार्फत आयोजन करण्यात आले आहे.