शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लातूर : रुग्ण संख्येत झपाट्याने घट; मंगळवारी आढळले ५१ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 22:12 IST

जिल्ह्यात सद्यस्थितीत ९३३ रुग्ण उपचाराधीन

ठळक मुद्देजिल्ह्यात सद्यस्थितीत ९३३ रुग्ण उपचाराधीन

लातूर: जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने घटत असून मंगळवारी नवे ५१ बाधित रुग्ण आढळले तर १६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता बाधितांच्या आलेख ८९ हजार ६१७ वर पोहोचला आहे. तर यातील ८६ हजार ३८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर तसेच गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २ हजार २९७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी २९७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. तर १८३५ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून ५१ रुग्णांची भर पडली आहे. तर उपचारादरम्यान मंगळवारी पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत घट होत आहे. दररोज हजारावर रुग्णसंख्या गेली होती. मात्र आता दोन अंकी रुग्ण संख्या आढळत आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. 

मृत्यूच्या संख्येतही घट आहे. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ९६ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. तर १३ रुग्ण गंभीर मेकानिकल व्हेंटिलेटरवर आहेत. ५६ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १८३ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु ऑक्सिजनवर आहेत. तर १०६ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु विनाऑक्सिजनवर असून ५७५ रुग्ण सौम्य लक्षणाची उपचार घेत आहेत. ९३४ रुग्णांपैकी ५५८ दवाखान्यात तसेच कोविड केअर सेंटर मध्ये दाखल आहेत. तर ३७५ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

१६० रुग्णांना मिळाली सुट्टी...गृहविलगीकरणात तसेच कोविड सेंटर आणि दवाखान्यात उपचार घेत असलेल्या १६० रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली. सदर रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गांधी चौक,एक हजार मुला-मुलींचे वस्तीगृह, शासकीय तंत्रनिकेतन आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर