शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपात नवनिर्वाचित ७० सदस्यांपैकी १९ अनुभवी; दिग्गज सदस्यांमुळे सभागृह गाजणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:04 IST

Latur Municipal Corporation Result 2026: प्रदीर्घ अनुभवाचा फायदा नव्या सदस्यांना आणि शहराच्या विकासाला होणार आहे.

लातूर : नुकत्याच पार पडलेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीनंतर आता सभागृहाचे चित्र स्पष्ट झाले असून, यंदा अनुभवी आणि अभ्यासू नगरसेवकांची मोठी फळी सभागृहात पाहायला मिळणार आहे. एकूण ७० सदस्यांपैकी १९ नगरसेवक अनुभवी असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा नव्या सदस्यांना आणि शहराच्या विकासाला होणार आहे.

सभागृहात सर्वाधिक अनुभव असलेल्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे माजी महापौर ॲड. दीपक सूळ आणि भाजपचे रविशंकर जाधव यांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी विजयाची 'पंचक' साजरी केली असून, त्यांची ही पाचवी टर्म आहे. महापालिकेचे कायदे-कानून आणि प्रशासकीय कामकाजावर त्यांची मोठी पकड आहे.

अनुभवी सदस्यांची फळी..!
केवळ ५ टर्मच नव्हे, तर अनेक सदस्य सलग तिसऱ्या आणि चौथ्यांदा निवडून आले आहेत. अहमदखा पठाण, गिरीश पाटील आणि देविदास काळे यांनी चौथ्यांदा सभागृहात प्रवेश केला आहे. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे (राष्ट्रवादी), सपना किसवे (काँग्रेस) हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

सातत्य आणि अभ्यासू वृत्ती..!
दीपक सूळ, रविशंकर जाधव, देविदास काळे, अहमदखा पठाण, सपना किसवे आणि विक्रांत गोजमगुंडे हे असे चेहरे आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कामात खंड पडू दिला नाही. सातत्याने जनतेचा विश्वास संपादन करत त्यांनी आपली जागा कायम राखली आहे. ७० पैकी १७ नगरसेवक अनुभवी असल्याने, महापालिकेच्या चर्चेचा स्तर उंचावण्यास मदत होईल. नवीन निवडून आलेल्या सदस्यांना कामकाजाचे धडे गिरवण्यासाठी या दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

यांना पुन्हा मिळाली सभागृहात जाण्याची संधी...!
ॲड. दीपक सुळ, रविशंकर जाधव, देविदास काळे, अहमदखा पठाण, सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, विक्रांत गोजमगुंडे, ज्योती आवासकर, सपना किसने, कांचन आजनीकर, विकास वाघमारे, रागिनी यादव, पप्पू देशमुख, कमल सोमवंशी, स्वाती घोरपडे, रविशंकर जाधव, दीपक मठपती, शितल मालू, शोभा पाटील हे पुन्हा सभागृहात पोहोचले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Experienced Members Dominate Latur Municipal Corporation After Election

Web Summary : Latur's newly elected municipal corporation boasts 19 experienced members among 70, including veterans like Deepak Sul and Ravishankar Jadhav. Their expertise promises better governance and guidance for new members, enhancing the corporation's discussions and developmental efforts.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६