शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

अहमदपूर तालुक्यात पेरणीयोग्य ७१ हजार ९९३ हेक्‍टर क्षेत्र आहे. यंदा सोयाबीनची आतापर्यंत २८ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली असून, ...

अहमदपूर तालुक्यात पेरणीयोग्य ७१ हजार ९९३ हेक्‍टर क्षेत्र आहे. यंदा सोयाबीनची आतापर्यंत २८ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली असून, ८ हजार ३७१ हेक्टरवर तूर, ३ हजार ७१४ हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र ६ हजार ८२४ हेक्टर असून, मागील वर्षीपेक्षा यामध्ये वाढ झाली आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले होते. तालुक्यात सरासरी ७२ टक्के पेरणी झाली असून, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांना पावसाची आस लागली आहे. आणखीन काही दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, त्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, पाऊस पडला तरच वेळेवर पेरणी होणार आहे. उशिरा पाऊस झाल्यास सोयाबीन सोडून इतर पिकांकडे शेतक-यांना वळावे लागणार आहे. आतापर्यंत अहमदपूर मंडळात ७४.५२ टक्के, खंडाळी ८२.३०, अंधोरी ३३.६८, किनगाव ७३.५१, शिरुर ताजबंद ७७.९८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पाऊस शिरूर ताजबंद मंडळात २७१ मि.मी. झाला असून, अंधोरी मंडळात पावसाच्या अनियमिततेमुळे पेरणीला प्रारंभ झालेला नाही. दरम्यान, जून महिना संपत आला असला, तरी समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आभाळाकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.

ओलावा असेल, तरच पेरणी करावी...

शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी थायरम व जिवाणूसंवर्धकाचा वापर करावा. तसेच सर्वसाधारण जमिनीत ओलावा असेल तरच पेरणी करावी, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी केले आहे.

मृगाचा पाऊस कमी, पेरण्या खोळंबल्या

अंधोरी व परिसरातील गावात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीत ओल झालेली नाही. त्यामुळे केवळ ३३ टक्केच क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जवळपास ६७ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या असून, अंधोरी परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असल्याचे शेतकरी संतोष कल्याणी यांनी सांगितले.