शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दैठणा येथे पपईच्या फळबागेत कलिंगडाचे आंतरपीक बहरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST

दैठणा येथील नामदेव माधवराव बिरादार या युवा शेतकऱ्याने पारंपरिक पीक पध्दतीस फाटा देत जवळपास एका एकरात दुहेरी फळबाग लागवड ...

दैठणा येथील नामदेव माधवराव बिरादार या युवा शेतकऱ्याने पारंपरिक पीक पध्दतीस फाटा देत जवळपास एका एकरात दुहेरी फळबाग लागवड केली आहे. त्यामध्ये आठ फुट सरी पध्दतीने पपईची लागवड केली असून,पपईस सहा महिन्यानंतर फळधारणा होते. त्यामुळे पपईच्या आठ सरी मध्ये तीन महिन्यात फळधारणा होणाऱ्या कलिंगडाची लागवड केली आहे.त्यामुळे पपईच्या फळ बागेत कलिंगडाचे आंतरपीक चांगलेच बहरले असून, केवळ ८० दिवसात पावणेदोन लाखाचे उत्पादन नामदेव बिरादार याना मिळाले असून, कलिंगडाचे पहिल्या तीन महिन्याचे उत्पादन घेतल्यानंतर नामदेव बिरादार यानी दुसऱ्यांदा पुन्हा कलिंगडाची लागवड करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे कमीत कमी दिवसात दुहेरी फळ लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येते याची पाहणी करण्यासाठी अनेक प्रायोगिक तत्त्वावर शेती करणारे शेतकरी भेटी देत आहेत.

८० दिवसात ३८ टनापर्यंत उत्पादन...

पपईस सहा महिन्यानंतर फळधारणा होत असते. त्यामुळे पपईच्या आठ फूट रुंद सरी मध्ये १६ बेड तयार करून नामदेव बिरादार यानी कलिंगडाची लागवड केली. त्यामुळे त्याना केवळ ऐंशी दिवसात ३८ टनापर्यंत कलिंगडाचे उत्पादन मिळाले असल्याने आता पर्यंत पावणेदोन लाखाच्या कलिंगडाची विक्री करण्यात आली असून, कलिंगडाची दुहेरी लागवड करण्याची तयारी त्यानी सुरू केली आहे.

५० गुंठ्यात लाखाचा मिळविला नफा...

नामदेव बिरादार या युवा शेतकऱ्याने सरकारी किंवा खाजगी नौकरीच्या मागे न लागता एका एकरात आठ फुट रुंद सरी तयार करून त्यात पपईची लागवड केली आणि आंतरपीक म्हणून कलिंगडाची लागवड केली त्यासाठी त्याना ७० हजार रूपयाचा लागवड खर्च आला.परंतु पावणेदोन लाखाचे उत्पादन मिळाल्यामुळे केवळ पन्नास गुंठ्यात एक लाखाचा निव्वळ नफा मिळाला आहे.