शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे थांबत नसल्याने संजीवनी बेटावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

वडवळ नागनाथ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर १३ सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र सुरू झाल्याने यात्रा भरली आहे. ...

वडवळ नागनाथ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर १३ सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र सुरू झाल्याने यात्रा भरली आहे. यात्रेसाठी राज्यासह इतर राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, रेल्वेचा सोपा मार्ग असून, केवळ रेल्वे वडवळ नागनाथ स्थानकावर थांबत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.

हैद्राबाद-परळी वैजनाथ या ब्राॅडगेज लाईनवर असलेले निजामकालीन वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशनवर कोणत्याच सुविधा नाहीत. स्टेशन मास्तरअभावी पार्सलची सुविधा नाही. काही वर्षांपूर्वी या स्थानकावरून भाजीापाल्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे परंतु, पुरेसे कर्मचारी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने संजीवनी बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे थांबविण्यास परवानगी द्यावी, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, निवारा, एटीएम मशीन आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

सर्वदूर परिचित असलेले संजवनी वनस्पती बेट व नऊ नाथांपैकी एक नाथ नागनाथ महाराजांचे मंदिर वडवळ येथे असून, टॉमेटो व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. लातूर रोड, चाकूर, उदगीर येथे काॅलेज व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थांची संख्याही अधिक असल्याने रेल्वे साेयीची ठरते. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे थांबविण्याची मागणी होत आहे.

पंधरा दिवस पर्यटकांची असते ये-जा...

सध्या उत्तरा नक्षत्र सुरू झाले असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील संजीवनी बेटावर पर्यटकांबरोबरच, वैद्य, हकीम यांची पंधरा दिवस रेलचेल असते. मात्र, हैद्राबाद-औरंगाबाद ही पॅसेंजर गाडी कोरोनाकाळापासून रेल्वे प्रशासनाने येथे थांबा बंद केला आहे. थांबा लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

स्थानकावरून धावतात या गाड्या...

वडवळ नागनाथ स्थानकावर हैद्राबाद-औरंगाबाद, हैद्राबाद-पूर्णा, निजामाबाद-पंढरपूर, परळी-मिरज या पॅसेंजर गाड्या थांबत होत्या. औरंगाबाद-बंगलोर, शिर्डी-काकीनाडा, नांदेड-पनवेल या एक्स्प्रेस गाड्याही धावतात. मात्र, या थांबत नसल्याने गैरसोय होत आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मदतीने लक्ष दिल्यास स्थानकाचा विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.