बोरगाव येथे शॉर्टसर्किटने घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:57+5:302021-06-10T04:14:57+5:30

५० हजारांचे आर्थिक नुकसान. चापोली : चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील एका घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या ...

A house caught fire due to short circuit at Borgaon | बोरगाव येथे शॉर्टसर्किटने घराला आग

बोरगाव येथे शॉर्टसर्किटने घराला आग

५० हजारांचे आर्थिक नुकसान.

चापोली : चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील एका घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत ५० हजाराचे नुकसान झाले आहे असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बोरगाव येथील रहिवासी बालाजी मुळे यांच्या राहत्या घराला मंगळवारी दुपारी शॉर्टसर्किटने आग लागली. आग लागल्याचे कळेपर्यंत तर आगीने उग्र रूप धारण केले होते. अक्षरशः संपूर्ण घर जळून खाक झाले. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने सायंकाळी ५ वाजता आग आटोक्यात आली. आगीमध्ये संसारोपयोगी भांडे, वस्तू, २ हजार २०० रुपये, पत्रे असे एकूण ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. सदरील घटनेची माहिती कळताच तलाठी शिवकुमार कस्तुरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: A house caught fire due to short circuit at Borgaon