शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

हिरोइन बनवण्याचे आमिष दाखवून अपहरण करणारे अटकेत

By admin | Updated: January 2, 2017 22:03 IST

"तुम्हाला सिनेमात काम देतो, हिरोईन करतो", असे म्हणून काही दिवस शूटिंग केल्याचे नाटक करून

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 2 -  "तुम्हाला सिनेमात काम देतो, हिरोईन करतो", असे म्हणून काही दिवस शूटिंग केल्याचे नाटक करून तथाकथित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या दोघा भावांनी लातूर येथील दोन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार आईने दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी कथित निर्माता-दिग्दर्शक असलेल्या दोन सख्ख्या भावांना तसेच अपहरण झालेल्या दोन्ही मुलींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेले निर्माता - दिग्दर्शक हे सख्खे भाऊ आहेत.
लातूर शहरातील रेणुकानगर भागातील दोन अल्पवयीन मुलींना चित्रपटात अभिनेत्रीचे काम देण्याचे आमिष रेणापूर तालुक्यातील मोहगाव (तळणी) येथील विजय खडके व राहुल खडके या सख्ख्या भावांनी दाखविले. दरम्यान, परळी येथे या मुलींना नेऊन काही दिवस चित्रिकरणही केले. त्यानंतर चित्रिकरणाचे काम थांबविले होते. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तथाकथित निर्माते खडके बंधूंनी दोन्ही मुलींना बोलावून घेतले. कॉफी पिण्याच्या निमित्ताने बोलावून थेट मोहगाव येथे नेले. मुली घरी आल्या नसल्याने आई-वडिलांनी चौकशी केली. त्यावेळी तथाकथित निर्माते खडके बंधूंनी बोलावून घेतल्याचे समजले. दरम्यान, मुलींशी भ्रमणध्वनीवरून पालकांनी संपर्क साधला. त्यावरून त्यांना पळवून नेल्याचे लक्षात आले. त्यामुळे पालकांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तथाकथित निर्माते विजय खडके व राहुल खडके यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी मोहगाव (तळणी) गाठून दोन मुलींसह सोमवारी पहाटे लातुरात आणले. या प्रकरणी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खडके बंधूंविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन यादव करीत आहेत.