Latur Heatwave: लातूरमध्ये उन्हाचा हाहाकार! शेतावरून घरी येताच तरुण कोसळला; उपचारांपूर्वीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:02 IST2026-04-28T13:56:56+5:302026-04-28T14:02:24+5:30

Latur Heatstroke Death: लातूर जिल्ह्यात उन्हाची लाट! ४ दिवसांत दोन संशयित मृत्यू; प्रशासनाकडून उष्माघाताच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन.

Heatwave Claims Another Life in Latur: 25-Year-Old Youth Dies After Returning from Farm in Ausa | Latur Heatwave: लातूरमध्ये उन्हाचा हाहाकार! शेतावरून घरी येताच तरुण कोसळला; उपचारांपूर्वीच मृत्यू

Latur Heatwave: लातूरमध्ये उन्हाचा हाहाकार! शेतावरून घरी येताच तरुण कोसळला; उपचारांपूर्वीच मृत्यू

औसा (जि. लातूर) : ऊन तीव्र झाल्याने शेतातून घरी आल्यावर चक्कर येऊन पडलेल्या औसा तालुक्यातील एरंडी येथील २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चार दिवसांपूर्वी गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात उष्माघाताचे आतापर्यंत दोन बळी गेले आहेत.

औसा तालुक्यातील एरंडी गावातील तरुण महेश लिंबाजी इंगोले (२५) हा २४ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास शेतावरून प्रखर उन्हामध्ये घरी आला. अंगणातील टाकीतून पाणी घेऊन हात धूत असताना चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. उपचारासाठी औशाकडे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना प्रथमदर्शी नातेवाइक व गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उष्माघाताने मयत झाल्याची सांगण्यात आले. महेश इंगोले यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. तालुक्यात मागील चार दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत आहे. दोन दिवसांपासून ४० ते ४१ अंश तापमान गेल्यामुळे उष्णतेपासून बचावासाठी नागरिक विविध उपाययोजना करीत आहेत.

उष्माघाताचा दुसरा बळी
तालुक्यातील गोंद्री गावात १९ एप्रिल रोजी शिया नेताजी गोरे या आठ महिने ९ दिवसांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, तर शुक्रवारी एरंडी येथील महेश लिंबाजी इंगोले (२५) यांचादेखील उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शवविच्छेदन अहवाल आल्यावर स्पष्ट
एरंडी येथील महेश इंगोले यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यात आले आहे. अद्याप अहवाल आलेला नाही. त्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे सांगणे शक्य नाही. अहवाल येताच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
- सुनीता पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, औसा

Web Title : लातूर में लू का कहर: खेत से लौटने पर युवक की मौत

Web Summary : लातूर के औसा के एरंडी गांव में भीषण गर्मी के कारण खेत से घर लौटने पर एक 25 वर्षीय युवक की चक्कर आने से मौत हो गई। इससे पहले गोंद्री गांव में नौ महीने के बच्चे की मौत हो गई थी। लू लगने का संदेह है, लेकिन मौत का कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही स्पष्ट होगा।

Web Title : Latur Heatwave: Young Man Dies After Returning from Farm

Web Summary : A 25-year-old man from Erandi, Ausa, Latur, died after collapsing upon returning home from the farm due to the intense heat. This follows the death of a nine-month-old baby in Gondri. Heatstroke is suspected, but the cause is pending autopsy results.