शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावातील वाढ तोकडी; पुनर्विचार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले ...

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले तर हमीभावातील वाढ अतिशय तोकडी आहे. त्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करून हमीभावात वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्यावतीने केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे. कडधान्य व तेलबिया उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली महागाई लक्षात घेता, दोन्ही पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात मोठी वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, केंद्राने फक्त तूर आणि उडीद पिकाच्या हमीभावात ३०० रुपयांची वाढ केली आहे तर मुगासाठी गतवर्षीपेक्षा ७९ रुपयांची वाढ केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजे यावर्षी सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव मिळणार आहे. महागाईमुळे खत, बियाण्यांच्या झालेल्या भाववाढीमुळे ३ हजार ९५०चा सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. नफा तर बाजूलाच राहिला.

मागच्या वर्षी सोयाबीनला मार्केटमध्ये उच्चांकी ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. मात्र, शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यानंतर हा भाव मिळाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच जास्त झाला. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव जाहीर करून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. अनेक भागात प्रमुख पीक असलेल्या धानाला गतवर्षीच्या तुलनेत फक्त ७२ रुपयांची वाढ मिळाली आहे. धानाला आता प्रतिक्विंटल फक्त १ हजार ४४० रुपये भाव मिळणार आहे. जो उत्पादन खर्चाच्या कमी आहे.

कापूस उत्पादकांनाही न परवडणारा दर

कापसाला लांब धाग्यासाठी २०० रुपये वाढ देत ५ हजार ५२ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपयांची वाढ करत ५ हजार ७२६ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. हा दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कापूस उत्पादक शेतकरी दरवर्षी कीड, नैसर्गिक आपत्तीने त्रासलेला असतो. शासनाने नव्याने हमीभाव जाहीर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केली आहे.