ओबीसी आरक्षण परत द्या, सरसकट पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST2021-09-18T04:21:29+5:302021-09-18T04:21:29+5:30

पीकांचे नुकसान झाल्यास ७२ तासामध्ये विमा कंपनीला नुकसानीची माहिती द्यावी लागते. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांना अनेक त्रुटींमुळे ऑनलाइन पिकांच्या नुकसानीची ...

Give back OBC reservation, do panchnama | ओबीसी आरक्षण परत द्या, सरसकट पंचनामे करा

ओबीसी आरक्षण परत द्या, सरसकट पंचनामे करा

पीकांचे नुकसान झाल्यास ७२ तासामध्ये विमा कंपनीला नुकसानीची माहिती द्यावी लागते. त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांना अनेक त्रुटींमुळे ऑनलाइन पिकांच्या नुकसानीची तक्रार देता आली नाही. तर काही मोजक्याच शेतकऱ्याने प्रत्यक्ष नुकसानीचे अर्ज दाखल केले. प्राप्त झालेल्या अर्जानुसार विमा कंपनीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी काही कारणे देत विमा कंपनीने मदत नाकारली होती. लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ अस्टुरे, उपसभापती शंकरराव पाटील, हावगीराव पाटील, मनोहर पटणे, दिलीप मजगे, संजय कासले, प्रशांत पाटील, अमर पाटील, ओम धनुरे, संतोष मंसुरे, मयूर पटणे, सूर्यभान वितपल, सचिन कडगे, संदेश चामले, दीपक बिरादार, गणेश शिंदे, लक्ष्मण डोपेवाढ, बालाजी मोदी, राजपाल बिरादार, शिवाजी गुंडरे, संजीव गणापुरे, दत्ता पांढरे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Give back OBC reservation, do panchnama