शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बीजोत्पादन करूनच बियाणे वापरावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

लातूर येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) शेतकऱ्यांसाठी ‘सोयाबीन, तूर व हरभरा पिकांचे बीजोत्पादन व काढणीनंतरचे व्यवस्थापन’ या ...

लातूर येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) शेतकऱ्यांसाठी ‘सोयाबीन, तूर व हरभरा पिकांचे बीजोत्पादन व काढणीनंतरचे व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. एम. आय. पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, प्रा. कैलास जाधव, जैव तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. ईश्वर पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डिग्रसे म्हणाले, लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यावर्षी जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. कमी खर्चात सोयाबीनचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च बीजोत्पादन करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. पेरणीपासून काढणी व नंतर बियाणांची हाताळणी योग्य पद्धतीने करावी. त्यावर प्रक्रिया करून ठेवल्यास बियाणे सुरक्षित राहतील.

प्रा. एम. आर. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी आधुनिक शेती करण्याची गरज आहे. आपणच उत्पादित केलेले बियाणे पेरणीवेळी शेतकऱ्यांना भरमसाठ किंमत मोजून विकत घ्यावी लागते. हे टाळण्यासाठी बीजोत्पादक व्हावे. शेतीवर आधारित असलेले इतर उद्योग व अवलंबित सर्व घटक जोमाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राचार्य झुल्पे यांनी कार्यशाळेची भूमिका विशद केली. प्रास्ताविक प्रा. ईश्वर पाटील यांनी केले. प्रा. शरद गंगावणे यांनी आभार मानले.

फोटो कॅप्शन :

कॉक्सिट महाविद्यालयात सोयाबीन कार्यशाळेत बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. एस. डिग्रसे. मंचावर संस्थाध्यक्ष प्रा. एम. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे.