शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक, पिण्यासाठी 'हे' कुटुंब बारमाही वापरते पावसाचेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 19:55 IST

स्वयंपाक अन् पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचा बारमाही वापर 

ठळक मुद्देमुरुडच्या खंडेलवाल कुटुंबाचा राजस्थानी पॅटर्न घराचे बांधकाम करतानाच पावसाचे पाणी साठविण्याची योजना तयार केली.

- नरसिंह कद्रे 

मुरुड (जि. लातूर) : एकीकडे उन्हाळ्यात घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना  लातूर तालुक्यातील मुरुड येथे गेल्या २० वर्षांपासून काशीराम खंडेलवाल यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचा बारमाही वापर केला आहे. विशेष म्हणजे हे पावसाचे पाणी स्वयंपाक व पिण्यासाठीही ते वापरतात. त्यांचा हा अनोखा प्रयोग मुरुड व परिसरात चर्चेत आहे. 

मुळचे राजस्थानमधील नागोर जिल्ह्याचे रहिवासी असलेले काशिराम खंडेलवाल हे कापड व्यवसायासाठी मुरुडला आले. २० वर्षांपूर्वी मुरुडला आलेल्या खंडेलवाल यांनी दैनंदिन वापरासाठी पावसाच्या पाण्याचा वापर सुरू केला. १४ वर्षांनंतर आजही कायम आहे. घराचे बांधकाम करतानाच त्यांनी पावसाचे पाणी साठविण्याची योजना तयार केली. त्यानुसार ५ फूट उंच, १४ फूट लांब व १० फूट खोलीचा हौद बांधला. तोही भूमिगत. या हौदात छतावर पडणारे पाणी दोन चेंबरमधून सोडले जाते. पाण्यातील कचरा हौदात जाऊ नये, यासाठी या दोन्ही चेंबरला जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा पडणाऱ्या दोन पावसाचे पाणी ते हौदात घेत नाहीत. परंतु, त्यानंतर पावसाचे पाणी हौदात घेतले जाते. एकदा हौद भरल्यानंतर त्यातील पाणी त्यांना २५ महिने पाणी पुरते.

सहा माणसांचे कुटुंबया हौदातून पाणी काढण्यासाठी खंडेलवाल यांनी १४ वर्षांपूर्वी घेतलेल्या बकेट व दोरीचा आजही उपयोग केला जातो. सहा माणसांचे कुटुंब असलेल्या खंडेलवाल यांना स्वयंपाक व पिण्यासाठी पावसाच्या पाण्याचाच आधार आहे. 

प्रवासात घरातून घेतले जाते पाणीखंडेलवाल प्रवासाला निघाले तर प्रवासाच्या वेळेनुसार लागणारे पाणी बाटलीत भरून घेतात. त्यामुळे बाहेरचे पाणी पिण्याचा प्रसंग कधी येत नाही. दर दोन वर्षांनी हौदाची स्वच्छता केली जाते. विशेष म्हणजे पाण्यावर सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतली जाते. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून आल्याने त्यांना पाणी बचतीचे फायदे चांगले माहीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीlaturलातूरdroughtदुष्काळ