अखेर लातूर शहरातील पथदिवे झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:30+5:302021-03-20T04:18:30+5:30

लातूर महानगरपालिकेकडे पथदिव्यांची चालू थकबाकी मोठ्या प्रमाणात थकली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या महिन्याचे चालू ...

Eventually the street lights in Latur city started | अखेर लातूर शहरातील पथदिवे झाले सुरू

अखेर लातूर शहरातील पथदिवे झाले सुरू

लातूर महानगरपालिकेकडे पथदिव्यांची चालू थकबाकी मोठ्या प्रमाणात थकली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ या महिन्याचे चालू वीज बिल थकले होते. या चारीही महिन्यांचे बिल मनपाने भरले आहे. जवळपास ९९ लाखांच्या आसपास वीज बिल भरले असून, अन्य पाणीपुरवठा योजनांचेही थकीत वीज बिल भरण्यात आले असल्याचे महानगर पालिकेतून सांगण्यात आले. दरम्यान, महावितरणने फेब्रुवारी महिन्याचे चालू बिल भरावे. त्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे एक दिवस वीज बिल भरूनही वीजपुरवठा खंडितच होता. मनपाने फेब्रुवारी महिन्याचे चालू वीज बिल भरण्याचे मान्य केल्यानंतर शुक्रवारी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे उजळले आहेत. अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका, औसा रोड, नांदेड रोड, बार्शी रोड, राजीव गांधी चाैक या सर्व मुख्य रस्त्यांवरील पथदिवे, तसेच शहरातील अंतर्गत वीज खांबांवरील पथदिवे बंद होते. त्यामुळे शहरवासीयांची अडचण झाली होती. अखेर मनपाने तजवीज करून वीज बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे.

Web Title: Eventually the street lights in Latur city started