शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घरी राहूनही अख्ख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

लातूर : हरंगुळ (खु.) येथील प्रा. मोहनराव झुंजे-पाटील यांच्या कुटुंबातील आठपैकी सहा सदस्यांना कोरोनाने घेरले होते. मात्र, कुटुंबातील या ...

लातूर : हरंगुळ (खु.) येथील प्रा. मोहनराव झुंजे-पाटील यांच्या कुटुंबातील आठपैकी सहा सदस्यांना कोरोनाने घेरले होते. मात्र, कुटुंबातील या सर्व सदस्यांनी न डगमगता एकमेकांना धीर देत कोरोनावर यशस्वी मात केली. विशेष म्हणजे, दीड वर्षांच्या सौम्यानेही कोरोनाला हरविले.

झुंजे यांच्या घरातील मनोज झुंजे यांचा अहवाल प्रारंभी पाॅझिटिव्ह आला होता. त्यामुळे घरातील सर्वांचीच तात्काळ चाचणी करण्यात आली. त्यात दोघे वगळता सहा जण पाॅझिटिव्ह आढळले. त्यात दीड वर्षांच्या सौम्याचाही समावेश होता. वेळेत उपचाराला सुरुवात केली. अहवाल आल्यानंतर घरात दोन दिवस भीतीचे वातावरण होते. शांताबाई झुंजे यांना रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे चार दिवस दवाखान्यात रहावे लागले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने सहाही जण घरीच डाॅक्टरांच्या देखरेखीखाली राहिले. या कुटुंबाने एकीने कोरोनाशी लढा दिला अन्‌ कोरोनामुक्त झाले.

मला ताप आल्यामुळे चाचणी केली. अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे घरातील सर्वांचीच चाचणी करण्यात आली. घरातील आठ सदस्यांपैकी सहा जण पाॅझिटिव्ह आले. आईला रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे भीती होती. परंतु, योग्यवेळी योग्य उपचार झाल्याने आम्ही कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो.

- मनोज झुंजे

घरातील सर्वच कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने चिंता होती. विशेषत: माझी दीड वर्षांची मुलगी पाॅझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली. परंतु, डाॅक्टरांनी धीर दिला. तिच्यावर बालरोगतज्ज्ञांकडून उपचार केले. घरीच डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार घेतल्याने आम्ही सर्वजण बरे झालो.

- सुप्रिया झुंजे