ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:06+5:302021-09-21T04:22:06+5:30

निलंगा तालुक्यातील बसपूर येथे रमेश केशव बिरादार यांच्या घरापासून ते अण्णाराव किशनराव बिरादार यांच्या घरापर्यंत जनसुविधा योजनेअंतर्गत रस्ता न ...

Demand for action against the contractor | ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

निलंगा तालुक्यातील बसपूर येथे रमेश केशव बिरादार यांच्या घरापासून ते अण्णाराव किशनराव बिरादार यांच्या घरापर्यंत जनसुविधा योजनेअंतर्गत रस्ता न करता रस्ता सिमेंट काँक्रिट पूर्ण केला आहे. म्हणून ठेकेदाराने खोटी कागदपत्रे व एम.बी. दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून रस्ता न करता पैसे उचलून गावकऱ्यांची फसवणूक केली आहे. ठेकेदारांनी जोडलेली कागदपत्रे तपासून रस्त्याची पाहणी करून शासनाची व ग्रामस्थांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सिद्धेश्वर बिरादार, गंगाधर चव्हाण, रामेश्वर क्षीरसागर, अण्णाराव मल्लिशे, गोविंद पवार, दशरथ बिरादार, बालाजी चव्हाण, उमाकांत स्वामी, शिवाजी बिरादार, धर्मराज बिरादार, धनराज क्षीरसागर, प्रभाकर क्षीरसागर, गुणवंत बावचे आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for action against the contractor