शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
7
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
10
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
11
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
12
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
13
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
14
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
15
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
16
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
17
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
18
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
19
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
20
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

आईला डबा देण्यासाठी निघालेल्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST

लातूर : आई व भाऊ कोरोनाबाधित असल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे. या दोघांना डबा देण्यासाठी दुचाकीवरून ...

लातूर : आई व भाऊ कोरोनाबाधित असल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे. या दोघांना डबा देण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तरुणाला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना लातुरातील उड्डाणपुलावर रविवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी सांगितले, दुचाकीवरून औसा रोड येथील कोविड सेंटरमध्ये भावाला भोजनाचा डबा दिल्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईला डबा देण्यासाठी निघालेल्या तरुणाला भरधाव कारने उड्डाणपुलावर जोराची धडक दिली. या अपघातात सदर तरुण गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अशोक चौगुले, गवारे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.

लातूर शहरातील उड्डाणपुलावरून शासकीय रुग्णालयाकडे तरुण दुचाकीवरून निघाला होता. दरम्यान, औसा रोडच्या दिशेने एक भरधाव कार निघाली होती. सदर तरुणाच्या दुचाकीला या कारने जोराची धडक दिली. या अपघातात तरुण जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. तो कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या भाऊ आणि आईला डबा देण्यासाठी निघाला होता.