अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:29+5:302021-04-30T04:24:29+5:30

नाथ नगर येथून दुचाकीची चोरी लातूर : शहरातील नाथ नगर येथून घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना २२ ...

Damage to mango crop due to untimely rains | अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

नाथ नगर येथून दुचाकीची चोरी

लातूर : शहरातील नाथ नगर येथून घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी शिवाजी दिगंबर जाधव यांनी नाथ नगर येथील आपल्या घरासमोर दुचाकी क्र. एमएच एई २४ -४९३९ पार्किंग केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पोहेकॉं. मुरुळे करीत आहेत.

चार्जिंगला लावलेल्या मोबाइलची चोरी

लातूर : शहरातील इस्लामपुरा येथील घरामध्ये चार्जिंगला लावलेले दोन मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी अलिम सलिम मोमीन यांनी आपल्या घरामध्ये दोन मोबाइल चार्जिंगला लावले होते. दरम्यान, चोरट्यांनी ते चोरून नेले. यामध्ये १७ हजारांचे नुकसान झाले असून, मोमीन यांच्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पोना. कोकणे करीत आहेत.

शिवीगाळ करून चारचाकीचे नुकसान

लातूर : रोडच्या कडेला चारचाकी लाव म्हणून विनाकारण शिवीगाळ करून भाड्याने आणलेल्या चारचाकी वाहनाच्या काचेवर तसेच हेडलाईटवर दगडाने मारून गाडीचे १५ हजारांचे नुकसान केल्याची घटना लातूर तालुक्यातील बोरी येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी शेख नसरुद्दीन अमिन (२६, व्यवसाय ड्रायव्हर, रा. बोकनगाव) यांच्या तक्रारीवरून वैभव मुकुंद सावंत व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसात एचएमएनसी दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. लोणकर करीत आहेत. या घटनेत फिर्यादीच्या चारचाकीचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Damage to mango crop due to untimely rains