शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लातूर शहराला आता सात दिवसाला पाणी;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 11:18 IST

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची माहिती

ठळक मुद्दे10 दिवसा आड येणारे पाणी आता येणार 7 दिवसाआडमालमत्ता कर भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ

लातूर : जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिक घरीच आहेत. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांनी पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे लातूर शहराला मांजरा धरणातून दर 10 दिवसाला पाणी पुरवठा केला जात होता. त्यात बदल करण्यात आला असून, सात दिवसाआड शहरवासीयांना पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठा करण्याची तयारी मनपाने केली असून, गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

मालमत्ता कर आणि सात दिवसाला पाणी अशा दोन्ही सकारात्मक बाबी असल्या तरी, नागरिकांनी 14 एप्रिलपर्यंत घरीच राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ...शहर महानगर पालिकेच्या वतीने मालमत्ता कर भरणा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात होती. त्यास 31 मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार कर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे.

 नागरिक कृती समितीद्वारे निर्णयाचे स्वागत...  गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्ती, सिल, अशी कठोर कारवाई सुरु केली होती. मालमत्ता कर आकारणी ही अवाजवी आहे म्हणून सातत्याने समितीने संघर्ष सुरू ठेवला. दरम्यान संपूर्ण जगात कोरोना मुळे नागरिकांच्या जिवन मरणाची लढाई सुरू झाली, या पार्श्वभूमीवर नागरिक हक्क कृती समितीने मालमत्ता कर भरण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ दिल्याने नागरिक कृती समितीच्या वतीने निर्णयाचे स्वागत करण्यात आले. पत्रकावर ऍड. उदय गवारे, बसवंत भरडे, श्रीकांत देशपांडे, विजय चितकोटे, दिनेष गिल्डा, धनंजय चिताडे, अजय कलशेट्टी, रणधीर सुरवसे, हेमंत जाधव विरभद्र वाले, सतीश देशमुख, आंबेसंगे, भालचंद्र कवठेकर, ऍड. शांतीवीर येरटे, अनुप देवणीकर, सुरज भोसले, ऍड. जगदीश शाहबादे, सलीम चौधरी, नयुम शेख, भिमा दुनगांवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर