शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST

संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या ...

संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : महिला व बालकल्याण कार्यालयाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची तपासणी केली असता, शून्य ते १८ वयोगटातील १७७पैकी १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोविड आजारामुळे पालक गमावलेल्या या बालकांचे संगोपन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत. संजय गांधी निराधार योजना तसेच बालकल्याण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी पालक गमावलेल्या बालकांना तत्काळ बालसंगोपन व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ देण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व पोर्टलवर अपडेट झालेल्या १,३८५ व्यक्तींच्या कुटुंबाची माहिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने घेतली असून, पोर्टलवर अपडेट न झालेल्या ४०० व्यक्तींची यादी आरोग्य विभागाकडून घेऊन त्यात अशा बालकांचा शोध घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी समितीला दिले. कोविड आजारामुळे मृत्यू होऊन अनाथ झालेल्या बालकांची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी, जेणेकरून अशा बालकांना शासनाकडून मदत देऊन त्यांचे संगोपन करणे व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे सोयीचे होणार आहे, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपाचे आयुक्त अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, प्रोबेशनरी सहाय्यक जिल्हाधिकारी जिथीन रहेमान, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, वर्षा पवार, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष व्यास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, पोलीस अधीक्षक प्रिया पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार

शून्य ते १८ वयोगटांतील बालकांवर कोठे अत्याचार होत असेल तर त्याविषयी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८वर तक्रार करता येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.